मोठं दिसण्यासाठी हंसिका मोटावानीला आईने दिली होती हार्मोनल इंजेक्शन्स? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली, “२१ वर्षांपूर्वी…”

Uncategorized

अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने बालकलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेत ती करुणा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. त्याचप्रमाणे हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातही ती झळकली. पण २००७ साली तिला हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले. कारण ती अचानक मोठी दिसू लागली होती. तेव्हा यावर विविध चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर अनेक वर्षांनी हंसिकाने भाष्य केलं आहे.

   

हंसिका तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे ही खूप चर्चेत राहिली आहे. २००७ साली जेव्हा तिने हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’ मध्ये काम केलं तेव्हा ती तिच्या वयाच्या मानाने मोठी दिसू लागली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिल असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं.

हे वाचा:   सपना गिलने वाढवल्या पृथ्वी शॉच्या अडचणी, गंभीर आरोप करत विविध कलमांखाली दिली तक्रार

या सगळ्याला अनेक वर्ष लोटली. तर आता तिने तिच्या मैत्रिणीच्या पूर्वाश्रमीच्या पतीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. आता अखेर हंसिकाने स्वतः हार्मोनल इंजेक्शनच्या अफवांचा विषय काढत सध्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ती म्हणाली, “ही एक कलाकार असण्याची किंमत आहे. मी २१ वर्षांपूर्वी त्यांनी अशा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या. तुम्हाला माहित आहे मी कशाबद्दल बोलत आहे ते. जर त्यावेळी मी त्याला खंबीरपणे सामोरी जाऊ शकले होते तर यावेळी जाऊ शकते. लोकांनी म्हटलं की माझ्या आईने मला लवकर मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिली.”

तर तिच्या आईने सांगितलं, “जर ते खरं असतं तर मला टाटा, बिर्ला किंवा कोणत्याही करोडपतीपेक्षा श्रीमंत असायला हवं होतं. जर हे खरं असतं तर मी म्हटलं असतं की, ‘मी माझ्या मुलीला इंजेक्शन दिलं आहे, तुम्ही या आणि मोठं दिसा.’ मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं की, हे सगळं जे लिहितात त्यांच्याकडे डोकं नावाचा प्रकार नसतो का?”

हे वाचा:   'लग्न करु की नको?'; चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ताचं भन्नाट उत्तर, म्हणली...

हंसिकाने तिच्या खास मैत्रिणीचा पूर्वाश्रमीचा नवरा सोहेलशी गेल्या डिसेंबरमध्ये लग्न केलं. आता आपल्याच मैत्रिणीच्या आधीच्या पतीशी लग्न केल्याने “मैत्रिणीच्या नवऱ्याला चोरलंस” असं म्हणत नेटकरी तिच्यावर निशाणा साधत आहेत.

Leave a Reply