शाहरुखचा लेक आर्यन कोणता धर्म मानतो, हिंदू की मुस्लिम? गौरी खानने स्वत:चं दिलं उत्तर

Uncategorized

किंग खान शाहरुखने चार वर्षांनंतर पठाण सिनेमातून कमबॅक केलं आहे. सिनेमाने पाच दिवसांत ५४५ कोटी रुपयांची कमाई केली. शाहरुखची क्रेझ आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात चर्चेत आला होता. आर्यनची आई हिंदू तर वडील मुसलमान आहेत. आर्यन खान कोणता धर्म मानतो?

   

स्वत: गौरी खानने दिलं उत्तर

आर्यन खान कोणता धर्म मानतो याचं उत्तर स्वत: गौरी खानने एका मुलाखतीवेळी दिलं होतं. शाहरुख खान मुस्लिम असून गौरी हिंदू आहे. गौरीने एका मुलाखतीवेळी त्यांच्या घरी सर्व सण, उत्सव साजरे होत असल्याचं सांगितलं होतं. होळी असो किंवा ईद घरी सर्व सण उत्साहात साजरे केले जातात.

आर्यन कोणता धर्म मानतो या प्रश्नाचं उत्तर गौरी खानने एका मुलाखतीत दिलं होतं. ती म्हणाली, आर्यन त्याच्या वडिलांच्या अतिशय जवळ आहे आणि त्यांना फॉलो करतो. आर्यन स्वत:ला मुसलमान मानतो असं गौरी म्हणाली. गौरीला मुलाखतीमध्ये लग्नानंतर तु कन्व्हर्ट का झाली नाही?

हे वाचा:   Nana Patekar यांना आजही सतावतेय एक्स – गर्लफ्रेंडची आठवण ; भावुक होत म्हणाले…

असा सवाल करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, माझं शाहरुखवर अतिशय मनापासून प्रेम आहे आणि त्याचा मी आदर करते. पण मी त्याचा धर्मही पाळावा असा त्याचा अर्थ होत नाही. हीच गोष्ट शाहरुखसाठीही लागू होते.

सुहानाला लिहायचा होता तिचा धर्म

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखची लेक सुहाना लहान असताना तिला शाळेत एक फॉर्म भरायचा होता. या फॉर्ममध्ये एका ठिकाणी आपला धर्म अर्थात रिलीजन लिहायचं होतं. त्यावेळी सुहानाने आपल्या वडिलांना रिलीजन काय असतं असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना किंग खानने आपण भारतीय आहोत आणि आपला कोणताही धर्म नाही असं उत्तर दिलं होतं.

Leave a Reply