prithvi shaw बरोबर हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केलय काम, VIDEO

Uncategorized

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ वादात सापडला आहे. एका हॉटेल बाहेर हाणामारी करतानाच पृथ्वी शॉ चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पृथ्वी शॉ आणि एका मुलीमध्ये मारामारी सुरु असल्याच या व्हिडिओमध्ये दिसतय. पृथ्वी शॉ ने सेल्फीसाठी नकार दिला, त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाल्याच सांगितलं जातय. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ सोबत दिसणाऱ्या मुलीच नाव सपना गिल आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केलीय. पृथ्वी शॉ चा या सपना गिलशी काय संबंध? कोण आहे ती? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

इन्स्टाग्रामवर तिचे किती फॉलोअर्स?

सपना गिल एक मॉडल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाख 18 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सपना तिचे फोटो आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते. मॉडल असण्याबरोबरच सपना एक अभिनेत्री सुद्धा आहे. तिने भोजपुरी चित्रपटात काम केलय. वर्ष 2017 मध्ये काशी अमरनाथ आणि 2021 मध्ये आई मेरा वतन या दोन चित्रपटात तिने अभिनय केलाय.

हे वाचा:   देवेंद्रजींना फराळात ‘हा’ पदार्थ खायला आवडतो, अमृता फडणवीसांनी सांगितले गुपित

कुठल्या स्टार अभिनेत्यासोबत काम केलय?

काशी अमरनाथ चित्रपटात सपना भोजपुरी अभिनेता रवी किशन, दिनेश लाल यादव आणि अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत काम केलय. सपनाचा लुक खूप ग्लॅमरस आहे. आपले फोटो आणि व्हिडियोजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पृथ्वी शॉ सोबतच्या वादामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबईत एका मोठ्या हॉटेलबाहेर हा सर्व वाद झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय. संबंधित तरूणीने आरोप केला आहे की शॉनेच तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर हल्ला केला. पृथ्वी शॉ त्याचे मित्र आशिष आणि ब्रिजेशसोबत एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता.

हे वाचा:   अक्षरा सिंह-अंजली अरोरा नंतर आता उर्फी जावेदचा बेडरूमचा व्हिडिओ लीक, या व्यक्तीसोबत मस्ती करताना दिसली.

जिथे सेल्फीवरून काही मुला-मुलींसोबत त्याचं भांडण झालं. शॉने आधी सेल्फी दिला मात्र परत सेल्फी घ्यायला आल्यावर त्याने आपण जेवण करत असल्याचं सांगत सेल्फी दिला नाही. शॉने नकार दिल्यामुळे तिथं भांडण झालं.

Leave a Reply