TMKOC : `तारक मेहता` मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा

Uncategorized

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC). गेली चौदा वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. पण गेल्या काही महिन्यात या मालिकेतील अनेक महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेला अलविदा केला.

   

या मालिकेत सर्वात महत्त्वाचं पात्र असलेल्या टप्पूची (Tappu) भूमिका साकारणाऱ्या राज अनादकटने (Raj Anadkat) नुकतीच मालिकेतून एक्झीट घेतली. राजने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आपण मालिका सोडत असल्याची माहिती दिली.

राज अनादकटने मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या दिग्दर्शकांनी लवकरच नवीन टप्पूची मालिकेत एन्ट्री होईल याचे संकेत दिले होते. आता यावर शिक्कामोर्तब झालंय. मालिकेत लवकरच नवा टप्पू दिसणार आहे. अभिनेता नितीश भलूनी (Nitish Bhaluni) याची टप्पूच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच नितीश टप्पू म्हणून तारक मेहतामध्ये दिसणार आहे. 

हे वाचा:   दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली; अभिनेत्रीवर कोट्यवधींचा गंडा घातल्याचा खळबळजनक आरोप

दिग्दर्शकांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश लवकरच शुटिंगला सुरुवात करेल. जेठालालचा मुलगा टप्पूच्या भूमिकेत नितीश प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार का हे लवकरच स्पष्ट होईल. तारक मेहताआधी नितीश ‘मेरी डोली मेरे अंगना’ या मालिकेत दिसला होता. पण छोट्या पडद्यावर नितीशसाठी ही सर्वात मोठी भूमिका ठरणार आहे. 

दरम्यान, दिग्दर्शक असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) आणि नितीश या दोघांकडूनही अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. नितीश भलूनी याच्याआधी राज अनादकट टप्पूची भूमिका साकारात होता. त्याने 2017 मध्ये या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्याआधी भव्या गांधी ही भूमिका साकारत होता.

डिसेंबर 2022 मध्ये राज अनादकटने मालिकेला अलविदा केला. त्याने एक पोस्टही शेअर केली होती. त्यात त्याने म्हटलं होतं, गेली पाच वर्ष या मालिकेशी जोडलो गेलोय, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो असं राजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Leave a Reply