भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. पृथ्वीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी दावा केला आहे की, पृथ्वी शॉने लग्न केलं आहे. त्याने स्वतःच त्याच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पृथ्वीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं आहे ‘हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे माय वायफी’ (माझ्या बायकोला व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा). परंतु काही वेळाने त्याने त्याची ही इन्स्टा स्टोरी डिलीट केली.
परंतु इन्स्टा स्टोरी डिलीट करेपर्यंत ती बरीच व्हायरल झाली आहे. खरंतर जी गोष्ट पृथ्वीला लपवायची आहे ती चुकून लोकांसमोर आली. पृथ्वीच्या लग्नाची बातमी व्हॅलेन्टाईन्स डेच्या दिवशी लोकांसमोर आली आहे.
निधी तापडियाशी लग्न?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पृथ्वी शॉने कोणाशी लोग्न केलं आहे. पृथ्वीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची गर्लफ्रेंड निधी तापडिया दिसत आहे. निधीसोबत त्याने लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे. निधी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अलिकडेच निधीसोबत फिरतानाचे पृथ्वीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
इन्स्टा स्टोरीमुळे लग्नाचं गुपित समोर आलं
पृथ्वी शॉने निधीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर डिलीट का केला ही गोष्ट कळू शकलेली नाही. परंतु त्याची इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्यापासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. कारण जर लग्न झालेलं नसेल तर त्याने कॅप्शनमध्ये वायफी असं लिहिलं नसतं.