अंबानी यांच्या ड्रायव्हरची चांदी, पोरांचं परदेशात शिक्षण, लाखो रुपये पगार आणि….

Uncategorized

उद्योगपती मुकेश अंबानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब रॉयल आणि लक्झरी लाइफ जगतंय. नीता अंबानी यांच्याकडे तर कारचं प्रचंड कलेक्शन आहे. यावरून त्यांना महागड्या कार खरेदी करण्याची आवड असल्याचं दिसून येतं. एका रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाकडे 500 गाड्या आहेत. अंबानी कुटुंबाच्या कार ड्रायव्हर्सना अत्यंत कडक ट्रेनिंगला सामोरे जावं लागतं. ही अवघड ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतरच त्यांना अंबानी कुटुंबात ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळते. त्यामुळे अंबानी कुटुंबातील ड्रायव्हर्सचा पगार किती असेल? असा प्रश्नच सर्वांनाच पडला असेल. जाणून घेऊया त्याविषयीच.

   

स्टाफची मुलं परदेशात शिकतात

अंबानी कुटुंबात काम करणाऱ्या स्टाफची कमाई लाखांच्या घरात आहे. या स्टाफची पगाराशिवाय राहणे आणि खाण्याचीही व्यवस्था केली जाते. तसेच विमा आणि शैक्षणिक भत्ताही दिला जातो. मीडिया रिपोर्ट्स नुसार, नीता अंबानी यांच्या ड्रायव्हरला दर महिन्याला दोन लाख पगार मिळतो. म्हणजेच नीता अंबानी यांच्या ड्रायव्हरला वर्षाला 24 लाख रुपये पगार मिळतो. विशेष म्हणजे या सर्व स्टाफची मुलं परदेशात शिकतात. असं असलं तरी अंबानी कुटुंबात नोकरी मिळणं इतकं सोप्पं नाहीये. अंबानींच्या घरी काम करायचे असेल तर कंपनीने दिलेली टेस्ट पास करावी लागते. ड्रायव्हरची निवड करतानाही तो मार्गात येणाऱ्या अडथळ्यातून कसा मार्ग काढतो हे सुद्धा पाहिलं जातं. त्यानंतरच त्यांची नियुक्ती केली जाते.

हे वाचा:   बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत विभस्त्र अवस्थेत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात

दिवसाची सुरुवात अशी

मीडिया रिपोर्ट नुसार, नीता अंबानी यांच्या चहाचीच किंमत लाखो रुपये आहे. नीता अंबानी यांच्या एक कप चहाची किंमत तीन लाख रुपये आहे. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. जपानमधील सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपातून नीता अंबानी चहा घेतात. नोरिटेक क्रॉकरी हा सोन्याने मढवलेला असतो. याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच एका कपाची चहाची किंमत तीन लाख रुपये होते.

झेड प्लस सेक्युरीटी

आपल्या महागड्या आवडींमुळे नेहमीच नीता अंबानी चर्चेत असतात. ज्वेलरी, हँडबॅग्सपासून ड्रेस आणि फूटवियर आदी सर्वांची किंमत लाखोंच्या घरात आहे. अब्जाधीश असलेल्या नीता अंबानी यांच्या स्टाफची सॅलरीही लाखोंच्या घरात आहे. अंबानी कुटुंबाला सरकारने झेड प्लस सेक्युरीटी दिलेली आहे. अंबानी कुटुंब मुंबईच्या अँटालिया या भव्य बंगल्यात राहतात. हा जगातील सर्वात महागडा बंगला आहे. या आलिशान बंगल्यात अंबानी कुटुंबाच्या सेवेसाठी 600 नोकर दिवस रात्र काम करतात.

Leave a Reply