ऐश्वर्यालाही टक्कर देणारी ‘सिर्फ तुम’ची अभिनेत्री सध्या काय करते? आता कशी दिसते?

Uncategorized

शाहरूख, सलमानसोबत काम करणाऱ्या आणि एकेकाळी आघाडीची नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीला कालांतराने यशाने अशी काही हुलकावणी दिली की, बॉलिवूडला तिने कायमचा रामराम ठोकला. आम्ही बोलतोय ते ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील आरती बद्दल. अर्थात आरतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल. प्रिया गिल हे तिचं नाव. निरागस चेहऱ्याच्या प्रियाचा ‘सिर्फ तुम’ सुपरडुपर हिट झाला होता.

   

खरं तर तिचा पहिला चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ हाही सुपरहिट होता. पण पहिल्या चित्रपटाच्या रिलीजनंतर चार वर्षांनी आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटाने प्रियाला खरी ओळख दिली. ‘सिर्फ तुम’नंतर ती एका रात्रीत स्टार झाली. आजही तिचा चेहरा चाहते विसरू शकलेले नाहीत. सौंदर्याच्या बाबतीत एकेकाळी ऐश्वर्यालाही टक्कर देणारी प्रिया गिल सध्या काय करते? आता कशी दिसते? हे आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. तर ती पुरती बदलली आहे. प्रिया गिल ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही. पण तिचे काही ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे वाचा:   विराट कोहली-अनुष्का शर्मा बॉडीगार्डवर खर्च करतात कोट्यवधी रुपये,पगार जाणून तुम्हीही लावाल डोक्याला हात

1995 साली मिस इंडिया फायनलिस्ट राहिलेल्या प्रियाने 1996 साली ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. कमी बजेटचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. यानंतर 1998 साली ‘शाम घनश्याम’ या चित्रपटात प्रिया झळकली. पण या चित्रपटाला फार यश मिळू शकलं नाही. सलमान खान, नागार्जुन, सुश्मिता सेन, संजय कपूर अशा अनेकांसोबत प्रियाने काम केलं. ‘जोश’मध्ये ती शाहरूखची हिरोईन बनली.

तोपर्यंत प्रिया गिलची जादू पुरती ओसरली होती. यामुळे प्रियाने बॉलिवूडमध्ये सोडून साऊथकडे मोर्चा वळवला. ‘मेघम’ हा मल्याळम सिनेमा तिने साईन केला. पंजाबी सिनेमातही तिने काम केलं. अखेरिस भोजपुरी सिनेमे करण्याची वेळ तिच्यावर आली. यानंतर मात्र ती जणू गायब झाली. तिने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या 17 वर्षांपासून ती कुठे गेली हे अनेकांना माहिती नाही. काही रिपोर्टनुसार, प्रिया देश सोडून डेन्मार्कमध्ये स्थायिक झाली आहे आणि सुखात संसार करतेय.

हे वाचा:   Shark Tank: 'पैसे तर दिलेच नाहीत उलट..', शार्क टँकच्या परीक्षकांवर स्पर्धकाचा गंभीर आरोप

 

 

Leave a Reply