बॉलिवूडच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक ‘भीगे होठ तेरे’ फेम मल्लिका शेरावत तुम्हाला आठवत असेलच. मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे.
मल्लिकाचा जन्म हरियाणातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक सेठ छज्जू राम यांच्या कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबीयांचा तिच्या अभिनय करण्याला विरोध होता म्हणून अभिनेत्री लांबा हे आडनाव लावत नाही.
मल्लिकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही काम केले आहे. मल्लिकाने हॉलिवूडमध्ये जॅकी चॅनसोबतही काम केले आहे.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे लग्न झाले होते. पण लग्नाच्या 1 वर्षानंतरच दोघांचे मार्ग वेगळे झाले.
मल्लिकाने प्रेमविवाह केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एअर होस्टेस म्हणून काम केले, जिथे तिची पायलट करण सिंग गिलशी भेट झाली. त्यानंतर तिची करणच्या प्रेमात पडली आणि नंतर त्यांनी लग्न केले.
पण दोघांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. वर्षभरानंतर मल्लिका आणि करणच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, स्वत: मल्लिकाने याबाबत कधीही उल्लेख केलेला नाही.
मल्लिका शेरावतने 2003 मध्ये दिग्दर्शक गोविंद मेनन यांच्या ‘ख्वाहिश’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने तब्बल २१ किसिंग सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती.
मात्र, या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळू शकली नाही. तिला खरी ओळख मिळाली ती 2004 मध्ये आलेल्या दिग्दर्शक अनुराग बासूच्या ‘मर्डर’ या चित्रपटातून.मल्लिका शेवटची Rk/RKay या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने गुलाबोची भूमिका केली होती.