भावाच्या मित्रावर प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; लग्नाआधी प्रग्नेंट राहिल्यानंतर मात्र…

Uncategorized

प्रेम… हा शब्द दिसायला लहान असला, तरी प्रेम निभावण्यासाठी नात्यामध्ये आदर आणि विश्वास असयला हवा… आपण एखद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्ह, त्याने देखील आपल्यावर तेवढंच प्रेम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रत्येकाला हवं असलेलं प्रेम मिळत नाही. फक्त सर्वसामान्य नाही तर, सेलिब्रिटींना देखील आयुष्यात या गोष्टीचा सामना करावा लागतो. ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिच्या खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्री कधीही खचली नाही. आज अभिनेत्री मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे.

   

एक काळ असा होता, जेव्हा महिमा ‘परदेस’ सिनेमातून एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या प्रेमात पडली. आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणून महिमा टेनिसपटू लिएंडर पेस यांना पाहत होती. जेव्हा सामन्यासाठी लिएंडर पेस मैदानावर असायचे तेव्हा महिमा बेंचवर बसून त्यांचा उत्साह वाढवायची.

हे वाचा:   ७५ वर्षीय नवरदेव अन् ७० वर्षांची नवरी विवाहबंधनात अडकणार; आयुष्याच्या सायंकाळी शोधला आधार

टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांनी जवळपास एकमेकांना तीन वर्ष डेट केलं. त्यानंतर दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. टेनिसपटू लिएंडर पेस याचं नाव मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत जोडलं जावू लागलं. रिया तेव्हा अभिनेता संजय दत्त याची पत्नी होती. एक दिवस महिमा हिने लिएंडर पेस आणि रिया यांना एकत्र बोलताना पाहिलं. त्यानंतर महिमाने लिएंडर पेस यांच्यासोबत असलेलं नातं तोडलं.

लिएंडर पेस यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर महिमा हिच्या आयुष्यात आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी यांची एन्ट्री झाली. बॉबी मुखर्जी अभिनेत्रा महिमाच्या भावाचा फार जवळचा मित्र होता. बॉबी आणि महिमा यांची ओळख एका कार्यक्रमात झाली. त्यानंतर पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर १९ मार्च २००६ मध्ये बॉबी आणि महिमा यांनी गुपचूप लग्न केलं.

हे वाचा:   बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी गर्लफ्रेंडनं लिहिलं असं काही की... वाचल्यावर हसून हसून पोट दुखेल

लग्नानंतर जेव्हा अभिनेत्रीचं बेबी बम्प समोर आलं, तेव्हा महिमा हिला बॉबीसोबत केलेल्या सिक्रेट लग्नाबद्दल सांगावं लागलं. तेव्हा लग्नाआधीच महिमा प्रेग्नेंट राहिल्याची तुफान चर्चा रंगली. त्यामुळे महीमा आणि बॉबी यांनी गुपचूप आणि लवकर लग्न उरकलं . त्यानंतर २००७ साली महिमाने गोंडस मुलीला जन्म दिला.

पण दोघांच्या नात्यात वाद सुरु झाले, जेव्हा बॉबी त्याच्या पहिल्या पत्नीसोबत असलेल्या कायदेशीर वादामुळे चर्चेत आला. त्यानंतर महिमा आणि बॉबी यांनी २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बॉबी आणि महिमा यांचा घटस्फोट झाला नसला तर दोघे एकत्र राहत नाही. तर महिमा १५ वर्षीय मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करते.

 

Leave a Reply