गरिबीत जन्मलेल्या गौतमी पाटीलच असं आहे घर, पहा फोटो….

मनोरंजन

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आईचे आजारपण आणि खरची परिस्थिती यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. दरम्यान तिच्या शिक्षण आणि पुढील प्रवासाविषयी जाणून घेऊया.

   

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.

हे वाचा:   'मी घरी बसून दारू प्यायचो आणि माझी पत्नी असे काम करायची..' बॉबी देओलने आपल्या आयुष्यावर केला धक्कादायक खुलासा....

आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.

गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते.

पुण्यात गौतमीने जास्त कार्यक्रम केले. पण कौल्हापूरमध्ये तिने जास्त शो केले. तिथल्या प्रेक्षकांकडून आपल्याला जास्त प्रेम मिळाल्याचे ती सांगते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. काही दिवसांपुर्वी अश्लिल डान्स प्रकरणी गौतमी पाटीलवर टीका करण्यात आली होती.

हे वाचा:   सुनेच्या प्रेमात पडले, मग ब्रेकअप झाले, असे आहे बॉलिवूडचे 'संस्कारी बाबूजी' आलोक नाथ यांचे लव्ह लाईफ....

गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो’च्या माध्यमातून मी लावणी करीत असते. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. असे असले तरीही इथून पुढे अश्लिल डान्स करणार नाही. लावणीचा अपमान होणार नसल्याचे ती सांगते.

Leave a Reply