टाइमपास संपला! अखेर प्रथमेशनं दिली प्रेमाची कबुली.. रिअल लाईफ प्राजूचे फोटो….

मनोरंजन

प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबनं त्याच्या प्रेमाची कबूली अखेर दिली आहे. मागचे अनेक दिवस प्रथमेशच्या रिअल लाईफ प्राजक्ताची चर्चा होती. दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. पण नेमकी तिची प्रथमेशची खरी प्राजक्ता आहे का यावर त्यानं काही सांगितलं नव्हतं. आज व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर प्रथमेशनं त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. क्षितीजा घोसाळकरबरोबर तो रिलेशनशिपमध्ये आहे.

   

दोघांनी मागच्या वर्षी मकर संक्रातीला एकत्र फोटोशूट केलं होतं. त्यानंतर दिवाळीत दोघांनी शेअर केलेल्या फोटोंनी चांगलीच चर्चा रंगली. प्रथमेशच्या चाहत्यांनी त्याला वहिनी छान आहेत म्हणत शुभेच्छा देखील दिल्या. आज अखेर प्रथमेशनं गर्लफ्रेंडच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ते एकत्र आले होते. आज व्हॅलेटाईनच्या दिवशीच त्यांनी त्यांच्या नात्याची सर्वांसमोर कबूली दिली आहे.

हे वाचा:   कुणी से'क्सची मागणी केली, कुणी म्हटलं मसाज दे ? राधिका आपटेचे बॉलीवूड बद्दल खळबळजनक खुलासा

क्षितीजा ही प्रथमेशच्या सगळ्या सिनेमांच्या प्रीमियरला हजर असते. त्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी ती त्याच्या बरोबर असल्याचं पाहायला मिळालं आहे. नुकताच त्याचा ढिशक्याव हा सिनेमा रिलीज झालाय. त्या सिनेमाच्या प्रीमियरला देखील क्षितीजा आली होती. सोशल मीडियावर प्रथमेशच्या प्रत्येक पोस्टला क्षितीजा कमेंट करत असते.

क्षितीजानं प्रथमेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ इन्स्टा स्टोरीला शेअर करत प्रथमेशनं ‘फिक्स कन्फर्म एकदम’ असं म्हणत प्रेमाची कबूली दिली आहे. तर व्हिडीओ शेअर करत प्रथमेशनं म्हटलंय, ‘ती म्हणते हे करू मी म्हणतो ok आणि हे असंच सुरू राहू दे’. प्रथमेशनं दोघांचा #Pratijaअशा हॅशटॅगही शेअर केला आहे. प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसळकर ही कंटेन्ट राईटर आहे. तसंच ती मॉडेलिंगही करते.

हे वाचा:   या गंभीर आजारामुळे उर्फी जावेद कमी कपडे घालते; व्हिडिओ शेअर करून सांगितले तिच्या शरीराची अवस्था....

क्षितीजानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं प्रथमेशवरील प्रेम व्यक्त केलं आहे. प्रथमेश आणि तिच्या लव्हस्टोरीची सुरूवात 16 फेब्रुवारी 2020पासून झाली. होकार मिळेपर्यंत 18 ऑक्टोबर 2020 उजाडलं. दोघांच्या पहिल्या भेटीचा व्हिडीओही तिनं शेअर केला आहे. दोघांना सिनेसृष्टीतील भरभरून प्रेमाचा वर्षाव होतोय. अभिनेत्री हृता दुर्गुळेनं हार्ट इमोजी शेअर केलेत. तसंच अभिनेत्री विदिशा म्हसकर, अक्षय केळकरसह अनेक चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलंय.

Leave a Reply