रिंकू राजगुरूच्या अकलूजमधील घराची झलक, पहा फोटो….

मनोरंजन

कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात. त्याची जीवनशैली अत्यंत सामान्य असते. अकलूजमध्ये आईवडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू राहते. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे.

   

रिंकूचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. मुळचे अकलूजचे असलेले रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांनी दहा वर्षांपूर्वी अकलूजच्या संग्राम नगर परिसरात मोठे घर बांधले. त्यांचे हे घर दुमजली आहे. वरती आणि खाली चार-चार खोल्या आहेत.

 

घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत. या घरात येण्यापूर्वी रिंकूचे कुटुंब अकलूजच्या राऊत नगरमध्ये वास्तव्याला होते. रिंकू सहा वर्षांची असताना राजगुरु कुटुंबीय नवीन घरात आलेत. याच घरात रिंकूचा धाकटा भाऊ सिद्धार्थचा जन्म झाला.

हे वाचा:   न्यू"ड व्हिडिओ लीक झाल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीने तोडले मौन, म्हणाली - ड्रायव्हरपासून वॉचमनपर्यंत....

रिंकूला चित्रकलेची आवड आहे घराच्या भिंतींवर रिंकूने स्वतः पेंट केलेले फोटो लावल्याचे पाहायला मिळतंय. रिंकू आज खूप लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे.असे असले तरीही रींकूचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. सामान्य आयुष्यच जगणे पसंत करते.

सैराट सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची. महाराष्ट्राच काय तर सारा देश आर्चीच्या प्रेमात पडला. सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली.

सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. सैराटच्या यशाने हुरुळून न जाता रिंकूचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

Leave a Reply