तब्बल 39 वर्षांनी तो योग आलाच… सचिन-सुप्रिया या लोकप्रिय गाण्यावर थिरकले, पहा दमदार डान्सची झलक….

मनोरंजन

अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.  सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी कायमच चर्चेत असते.

मराठी मनोरंजन विश्वातील ही लोकप्रिय जोडी आहे. या जोडीला रंगमंचावर एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच अतुर असतात.  आता चाहत्यांसाठी एक गुडन्य़ूज आहे. सर्वांची ही लाडकी जोडी ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ निमित्ताने तब्बल 39 वर्षांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करणार आहेत.  काहींनी हे गाणं देखील ओळखलं असेलच.

1984 साली आलेल्या नवरी मिळे नवऱ्याला या गाजलेल्या सिनेमात या दोघांनी हि नवरी कसली गाण्यावर डान्स केला होता. आता याच गाण्यावर तब्बल 39 वर्षांनी सचिन – सुप्रिया थिरकणार आहेत. दोघांचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सचिन – सुप्रिया यांची लोकप्रिय जोडी एकमेकांसोबत डान्स रिहर्सल करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सचिन-सुप्रिया या जोडीने आपल्या चित्रपटांतून नृत्यातून सर्वांचीच मन जिंकली. दरम्यान सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांनी  ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरत घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ यासह अनेक चित्रपटात एकत्र काम केलं.  सचिन आणि सुप्रिया यांना श्रेया ही मुलगी आहे. श्रियाही मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून अनेक नावाजेल्या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. श्रियाचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे.

हे वाचा:   आकाराने जाड असलेल्या या अभिनेत्री आहेत सौंदर्याची खान, बघा त्यांचे हॉ'ट लूक मधील काही फोटोज्.!

‘झी चित्र गौरव पुरस्कार 2023’ लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना अनेक सरप्राईज बघायला मिळणार आहेत. या सोहळ्यात सर्वांची लाडकी जोडी सचिन-सुप्रिया यांचा डान्स पाहायला मिळणार आहे. शिवाय साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मीका देखील लावणी सादर करणार आहे. त्यामुळं यंदाचा सोहळा खास असणार हे नक्की आहे.

Leave a Reply