शिव ठाकरे याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वाचे विजेतपद पटकावले. या शो नंतर त्याचे नशीबच बदलले. शिव या शोनंतर जास्त प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर तो हिंदी बिग बॉस शोच्या सोळाव्या सीझनमध्ये दाखल झाला. इतकेच नाही तर त्याने फिनालेपर्यंत मजल मारली. शिव ठाकरे बिग बॉस १६ चा उपविजेता ठरला. ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीनं शिव ठाकरेला हुलकावणी दिली. पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र तो यशस्वी झाला. ‘बिग बॉस १६’नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. शिव ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता.
‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी मिळाली नसली तरीही त्याच्या वाट्याला सलमान खानचा एक मोठा चित्रपट आला असल्याचं कळतंय. ‘बिग बॉस १६’नंतर शिवचं नशीब उडलं. रिक्षा,बस किंवा ट्रेन प्रवास करणाऱ्या शिवने त्याची पहिली नवी कोरी कार खरेदी केल्याचं सांगितलं होतं.
‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शिवचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या शिव विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याने स्वतःचे युट्यूब चॅनेल लाँच केले आहे. याशिवाय तो वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहे.