सिद्धार्थ जाधव व अशोक सराफ यांच्या ‘या’ हळव्या व्हिडीओनं सगळ्यांनाच रडवलं, पहा विडिओ….

मनोरंजन

यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच सोहळ्यातील एक सुंदर हळवा क्षण पाहून तुमचेही डोळे पाणावतील. होय, आपले सर्वांचे लाडके मामा अर्थात अभिनय सम्राट अशोक सराफ  यांना या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तत्पूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना.

   

या क्षणाचा एक खास व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.  हा व्हिडीओ तुम्हालाही भावुक करेल. नृत्य सादर करून केल्यावर सिद्धार्थ जाधवने जे काही केलं ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अ श्रू तरळले.

परफॉर्मन्स झाल्यावर सिद्धार्थ जाधव हातात फुलांची माळ घेऊन अतिशय कृतार्थ भावनेने मंचावरून खाली येतो.  फुलांची माळ अशोक मामांच्या गळ्यात घालतो आणि अशोक मामांना साष्टांग दंडवत घालतो. अशोक सराफ हे पाहून गहिवरून जातात.  त्यांचे डोळे पाणावतात. तेच नाही तर तिथे उपस्थित प्रत्येकाला हा क्षण हळवा करून जातो. अलका कुबल, जयवंत वाडकर, अशोक शिंदे यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

हे वाचा:   अर्जुन कपूरची बहीण लपून-छपून करतेय या व्यक्तीला डेट,आता उघड झाले गुपित !

यानंतर महेश कोठारे व सचिन पिळगावकर हे अशोक मामांचे जिगरी यार त्यांना आदराने मंचावर घेऊन जातात. अख्खी गर्दी त्यांना उभं होत मानवंदना देते आणि अशोक सराफ अतिशय नम्रपणे हात जोडून सर्व मायबाप प्रेक्षकांचे, उपस्थित कलाकारांचे आभार मानतात. त्यांची मानवंदना स्वीकारतात. हा हळवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

प्रेक्षकांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा येत्या रविवार २६ मार्चला संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. खास बात म्हणजे या सोहळ्यात मराठीतली सदाबहार आवडती जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.

Leave a Reply