I.P.S विश्वास नागरे पाटील यांच्या गावाकडच्या घराची झलक, पहा फोटो….

मनोरंजन

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९७३ ला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावात झाला. वारणेच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेले हे हिरवेगार गाव, गावाच्या तीनही बाजूने नदी वाहते त्यांचे लहानपण अगदी खेडेगावातील सामान्य कुटूंबातील मुलांप्रमानेच गेले. जसे आंब्याच्या, जांभळाच्या झाडावर चढणे, नदीला जाऊन मासे पकडणे, शाळेतून घरी आल्यावर म्हशीच्या धारा काढणे.

   

त्यांचे वडील नावाजलेले पहिलवान त्याचबरोबर गावचे सरपंच होते. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती कि विश्वासने चांगला पहिलवान व्हावे. पण तालमीत त्यांचे मन रमले नाही म्हणून वडिलांनी त्यांना शाळेत शिकायला पाठविले. शाळेत पाहिलवानाचा मुलगा सरपंचाचा मुलगा म्हणून दादागिरी करायचे. वर्गशिक्षकाच्या खुर्चीवर बसायचे. हा पाहिलवानाचा मुलगा सरपंचाचा मुलगा उगाच कशाला नादाला लागायचे म्हणून शिक्षक सुद्धा दुर्लक्ष करायचे. सुरवातीला ५ वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावच्या शाळेतच झाले.

हि शाळा गावापासून १८ किलोमीटर लांब होती. त्यांना बसने जायला १.५ तास लागायचा सकाळी ८ च्या बस ने जायचे व संध्याकाळी ५ च्या बसने परत यायचे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे वडील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन पंचायत समितीचे सभापती झाले. विश्वास दहावीला असताना त्यांचे पी.टी चे शिक्षक गायकवाड सर यांनी बघितले कि विश्वास हा मुलगा हुशार आहे.

हे वाचा:   या अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास झाला तयार,पहा कोण आहे हे अभिनेत्री.!

७० ते ७५ % पर्यंत मार्क्स सुद्धा मिळवतोय. पण त्याचा येण्या जाण्यात खूप वेळ वाया जातोय. ते शिक्षक विश्वास ला म्हणाले तू माझ्या घरी रहा त्यामुळे तुला अभ्यास करायला जास्त वेळ मिळू शकेल. त्याप्रमाणे ते सरांच्या घरी राहायला गेले व रोज सकाळी ३:३० ते ८:३० वाजेपर्यंत अभ्यास करत राहिले. त्याचा परिणाम असा झाला १९८८ ला १० विच्या परीक्षेत त्यांना ८८ % गुन मिळाले व ते तालुक्यात पहिले आले. ते फक्त शक्य झाले गायकवाड सरांमुळे. मग पुढे जाऊन ११ वी सायन्स ला कोल्हापूर येथील न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतले.

MPSC मधून डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर PSI अशा १३ परीक्षा या ८ महिन्यांच्या काळात नॉनस्टॉप पास होत गेले. त्यांचा इंटरव्हियु दिल्लीच्या धोलपूर हाऊस मध्ये झाला. त्यावेळी त्यांना टाय ची गाठ सुद्धा बांधता येत न्हवती. इंग्रजी सुद्धा नीट बोलता येत न्हवते. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी त्यांचा इंटरव्हियु घेतला. इंटरव्हियुमध्ये त्यांना घाशीराम कोतवाल बद्दल प्रश्न विचारला गेला.

त्याच बरोबर त्यांना हिंदी मधून शेवटचा प्रश्न विचारला गेला “विश्वास इस दुनिया मे तुम क्यू आये हो? याचे उत्तर त्यांनी असे दिले “या ठिकाणी संघर्ष करायला आलो आहे. आतापर्य प्रतिकूल परिसथितीशी संघर्ष करत मी इथंपर्यंत आलोय आणि आता तुम्ही जर मला संधी दिली तर सिस्टीम मधल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करायची माझी इच्छा आहे.” आणि हेच उत्तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांना आवडले असावे. त्या इंटरव्हियु मध्ये सगळ्यात जास्त ३०० पैकी २१० मार्क्स मिळाले. १९९७ ला त्यांचे IPS मध्ये सिलेक्शन झाले तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त बी ए (इतिहास) पर्यंत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून पूर्ण झाले होते.

हे वाचा:   चित्रपटात काम मिळवण्यासाठी शा’री’रिक सं’बंधाची मागणी ठेवली होती या 5 अभिनेत्रींसमोर.!

२६/११ चा मुबंई वरती दहशदवादी हल्ला झाला तेव्हा ताजमहाल हॉटेलमध्ये सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर बुलेटप्रुफ जाकीट नसतांनाही ते ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत गेले. दुसर्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मधून सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. सकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी हॉटेल मधून १३५० लोकांना सुरक्षित बाहेरकाढून त्यांचे प्राण वाचवले. त्यांचा हा पराक्रम बघून भारत सरकारने २०१३ ला त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक देऊन गौरव केला.

Leave a Reply