घाबरतच प्रविण तरडेंनी स्मिताच्या गालावरून हात फिरवला आणि मग पुढे जे झालं ते….

मनोरंजन

सर सेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅर्टन’, ‘धर्मवीर’ सारख्या दमदार सिनेमातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रवीण तरडेंचे सिनेमे म्हणजे दमदार असणार यात काही शंका नाही. सर सेनापती हंबीररावनंतर प्रवीण तरडे पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहेत. त्या सिनेमाचं नाव म्हणजे ‘बलोच’. बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित ‘बलोच’ या सिनेमात प्रवीण तरडे पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात प्रवीण तरडे यांचा रोमँटिक अंदाज देखील पाहायला मिळणार आहे.

   

अभिनेत्री स्मिता गोंदकर सिनेमात प्रवीण तरडेंच्या बायकोच्या भूमिकेत आहेत. दोघांवर एक रोमँटिक गाणं देखील शुट करण्यात आलं आहे. नुकतंच दोघांचं खुळ्या जीवाला हे गाणं रिलीज झालं. पहिल्यांदा प्रवीण तरडे मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहायला मिळाले. रोमँटिक सीन करताना प्रवीण तरडेंची मात्र चांगलीच वाट लागली होती. नुकत्याच एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी स्मिता गोंदकर बरोबर रोमँटिक सीन शुट करताना तो किस्सा सांगितला.

हे वाचा:   Pushpa आणि KGF 2 नंतर प्रेक्षकांसाठी साऊथ इंड्रस्ट्रीचा 'हा' कडक सिनेमा,पहा टीजर

बलोच सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “रोमँटिक असं काही माझ्या स्वभावात नाहीये. मी कधीच हे केलं नाहीये. माझ्या बायकोने तर ते गाणं पाहिलंच नाही. ते गाणं इतकं सुंदर झालंय की माझी बायको सोडून ते सर्वांनी पाहिलं आहे”.

“या गाण्यात रोमँटिक प्रवीण तरडे दिसला. हे पाहून मलाही थोड आश्चर्य वाटलं की ऐरवी तलवार चालवताना मी किती कॉन्फिडन्ट दिसतो. तेच रोमँटिक सीन करताना मी घाबरत घाबरत स्मिताच्या गालाला हात फिरवलाय. शेवटी तिच मला म्हणाली, अहो सर बी कम्फर्ट. मग तिला म्हणालो की, तसं नाही. पण हा माझा जॉनर नाहीये. म्हणून असं होतंय. माझा ऑडियन्स वेगळा आहे. त्यामुळे रोमँटिक गाणं करताना माझ्या नाकी नऊ आले होते. पण मी कसबस केलं”, असं प्रवीण तरडे म्हणाले.

हे वाचा:   Sunny Leoneचा बैडरूम मधील प्राइवेट वीडियो चुकून झाला लीक,आता होत आहे फारच वायरल

बलोच हा सिनेमा 5 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या सिनेमातील ‘खुळ्या जिवाला आस खुळी’ हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या सिनेमात एका मराठ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Reply