साऊथ मधील फेसम अभिनेत्यांमधलं एक नाव म्हणजे धनुष. अभिनेत्याने ना केवळ साऊथ सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली तर हिंदी सिनेमातही त्यानं प्रसिद्ध मिळवली. रांझणा या सिनेमानं धनुषला बॉलिवूडमध्ये नवी ओळख निर्माण करू दिली. धनुषच्या या सिनेमानं त्याची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात वाढली. धनुष हा सर्वाधिक फॅन फॉलोविंग असलेल्या कलाकारांमधील एक आहे. प्रोफेशनल लाइफबरोबर त्याची पर्सन लाइफ देखील चर्चेत असते. नुकताच धनुषला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. नेहमीच हँडसम लुकमध्ये दिसणाऱ्या धनुषचा यावेळी वेगळाच अवतार पाहायला मिळाला. त्याला ओळखणचं कठीण झालं होतं. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये धनुष पिंक कलरच्या स्वेटशर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये स्पॉट झाला. धनुष येणार म्हणून त्याचे फॅन्स नेहमीप्रमाणे गर्दी करून उभे होते. पण अभिनेता समोर येताच चाहत्यांना देखील शॉक बसला. कारण धनुषनं त्याचा संपूर्ण लुकचं बदलून टाकला आहे. साऊथचा गुड लुकींग हिरो असलेल्या धनुषला ओळखणंच कठीण झालं. धनुषनं खांद्यापर्यंत केस वाढवले आहेत. त्याचप्रमाणे दाढी देखील वाढली आहे. डोळ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल लावून धनुष एअरपोर्ट आला. त्याचा बिअर्ड लुक कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होतोय.
धनुषचा नवा लुक पाहून नेटकऱ्यांना रामदेव बाबांची आठवण जाली आहे. धनुषचा असा अवतार पाहून एका युझरनं लिहिलंय, “मला वाटत धनुष रामदेव बाबांचा बायोपिक करतोय”. तर आणखी एका युझरनं, “राम देव बाबांचे कपडे घालून यायचं ना”, असं म्हटलंय.
View this post on Instagram
“वाथी प्रमोशन स्टाइल, माझी आवडती हेअर स्टाइल”, असं कॅप्शन देत धनुषनं त्याचा नवा लुक शेअर केला आहे.
सुपरस्टार धनुषचे काही सिनेमे येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान नुकताच त्याचा ‘वाथी’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘वाथी’ सिनेमात धनुषनं एका प्रोफेसरची भूमिका निभावली होती.1990मध्ये शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी लढणाऱ्या एका प्रोफेसरची ही गोष्ट सिनेमात दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता धनुषचा नवा सिनेमा येत आहे हे त्याच्या या नव्या लुकवरून समोर आलं आहे.