मलायका अरोराचं खरं वय ऐकल्यानंतर बसेल जबरदस्त धक्का, अभिनेत्रीनं तब्बल 8 वर्षाचा केला आहे झोल.? ‘त्या’ Video मुळे आलं सत्य समोर..

मनोरंजन

मलायका अरोरा तिच्या लुक्समुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. याशिवाय ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. पण आता मलायकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे आणि यासाठी लोक त्यांना अनेकदा ट्रोल करतात. पण फक्त अर्जुनच नाही तर मलायका एक्स पती अरबाज खानपेक्षाही 2 वर्षांनी मोठी आहे.

   

सध्या मलायका अरोराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ज्यामध्ये तिनं आपलं खरं वय सांगितले आहे. या व्हिडिओमुळे मलायकाचं खरं वय समोर आलं आहे, त्यानंतर चाहते संभ्रमात पडले आहेत. मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मलायका स्वत: सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आता ही अभिनेत्री तिच्या खऱ्या वयामुळे चर्चेत आहे.

हे वाचा:   पत्नीनंतर Shahid Kapoor सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करायच्या तयारीत? अखेर तिला Propose केलंच

खरं तर मलायका आणि तिचा एक्स नवरा अरबाज खान साजिद खानच्या एका जुन्या शोमध्ये गेलेले दिसत आहेत. या शोमध्ये साजिद मलायका आणि अरबाजची मुलाखत घेताना दिसत आहे. ज्यामध्ये तो मलायकाला विचारतो की, अरबाज तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे, मग याबद्दल तुला कसे वाटते. यावर मलायका उत्तर देते की, मला तर खूप छान वाटते. मलायकाच्या या व्हिडिओमुळे चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. अरबाज खानचे वय 55 वर्षे आहे. मात्र, विकिपीडियाने मलायकाचे वय 49 वर्षे असल्याचे म्हटले आहे. यानुसार अभिनेत्रीच्या वयात पूर्ण 8 वर्षांचा बदल केला आहे. , याबाबत चाहते संभ्रमात आहेत. अशात एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, ‘जर ती 57 वर्षांची आहे तर वाह ती मग खूपच हॉट आहे’.

हे वाचा:   जिला छोटी-मोठी अभिनेत्री समजत होतो ती निघाली जुही चावलाची खरी बहीण, फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून करत आहे डेट

चाहत्यांनाही आश्चर्य वाटते की जर ती 57 वर्षांची असेल तर या वयातही ती इतकी फिट आहे, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मलायका अरोरा गेल्या चार वर्षांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे. यापूर्वी तिने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. बराच काळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर 2017 मध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर 2019 पासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो व रोमॅंटिक व्हिडिओ देखील शेअर करत असते. अनेकदा दोघं विविध ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. दोघांनीही मीडियापासून आपलं नातं कधीच लपवलेलं नाही. या दोघांना त्यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

Leave a Reply