धक्कादायक.! मुंबईत लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैं-गि-क अत्याचार, सकाळी 7.30 वाजता घडली घटना….

ट्रेंडिंग

मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. परीक्षेला जात असलेल्या विद्यार्थीनीवर सकाळी साडे सातच्या सुमारास अत्याचार केले. विद्यार्थीनी लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यातून प्रवास करत असताना घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

   

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक २० वर्षीय विद्यार्थीनी सकाळी 7.28 च्या CSMT-पनवेल लोकलमध्ये बसली होती. द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यातून ती प्रवास करत होती. तेव्हा ट्रेन सुरू होताच आरोपी डब्यात चढला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी विद्यार्थीनीने स्वत:ला वाचवण्याचाही प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी एका वृद्ध महिलेने पोलिसांना फोन करेन असा इशाराही आरोपीला दिला. पण त्याकडे न पाहता आरोपीने विद्यार्थीनीवर अत्याचार केला. लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात येताच विद्यार्थीनी खाली उतरली आणि तिने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाज करीमला 8 तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,अशा घटनांमुळे लोकल गाड्यांमधील रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे वाचा:   मॉडेल असणारी ऐश्वर्या अशाप्रकारे बनली IAS अधिकारी...फोटो पाहून आश्चर्य वाटेल

Leave a Reply