‘हेच शिवरायांचे मावळे’; कोसळणाऱ्या धबधब्यातून खाली उतरला परशा; सह्याद्रीमध्ये रंगला साहसी खेळ.!

मनोरंजन

अभिनेता आकाश ठोसर सध्या त्याच्या ‘बाल शिवाजी’ या आगामी चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी समोर आले आणि शिवछत्रपतींच्या भूमिकेत आकाशला पाहून सर्वांनीच आनंद व्यक्त केला. त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता आकाशचा असा एक व्हिडिओ समोर आला, जो पाहून त्याचे चाहते ‘हेच खरे शिवरायांचे मावळे’ असं म्हणत अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. सध्या पावसाळी वातावरणात अनेक हौशी ट्रेक, रॅपलिंग असे साहसी खेळ करताना दिसतात. आकाशही याच हौशी ट्रेकर्सपैकी एक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी महाराजांच्या एका गडावरील फोटो शेअर केला होता. आता एक पाऊल पुढे जात तो सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांमध्ये वॉटरफॉल रॅपलिंग करताना दिसला.

   

वॉटरफॉल रॅपलिंग हा असा प्रकार असतो ज्यामध्ये कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये वरुन खाली उतरावं लागतं. आकाशच्या कंबरेला Harness बांधलेलं असून योग्य ती खबरदारी घेऊन तो हा साहसी खेळ करत आहे. त्याच्यासोबत अनुभवी ट्रेकर्स आणि वॉटरफॉल रॅपलिंग करणाऱ्यांची टीमही दिसते आहे. हा साहसी खेळ करताना आकाशच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नसल्याची गोष्टही चाहत्यांनी टिपली. एकाने कमेंट करत त्याच्या या कृतीचे कौतुक केले की पहिल्यांदाच सह्याद्रीमध्ये वॉटरफॉल रॅपलिंग करताना त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

‘सह्याद्री वॉटरफॉल रॅपलिंग, जय शिवराय’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहातून ही मंडळी खाली उतरत आहेत. व्हिडिओमध्येच हा धबधबा उचंच-उंच असल्याचं जाणवत आहे, प्रत्यक्षात तिथे रॅपलिंग करणं हा वेगळाच थरार असणार आहे. अभिनेत्याच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत ‘आकाश जरा सांभाळून’ असे म्हणत काळजी व्यक्त केली आहे. तर अन्य एकाने असे म्हटले की, ‘दादा तुम्ही खूपच हिंमत दाखवली. पहिल्यांदा जी व्यक्ती सहयाद्री मध्ये रॅपलिंग करते त्यांच्या चेहऱ्यावर थोडीफार भीती दिसते, पण तुमच्या चेहऱ्यावर ते कुठेही दिसले नाही तुम्ही खूप सहयाद्री प्रेमी आहात.’

हे वाचा:   पती विकी कौशल सोबत आपल्या प्रेग्नेंसी ची घोषणा करणार आहे कतरीना कैफ,या दिवशी...

‘आज कुछ तुफानी करते है’, ‘काळजी घे आकाश’, ‘याला म्हणतात खरा बाहुबली नाहीतर vfx तर आहेतच’, ‘हेच खरे शिवरायांचे मावळे’ अशाही अनेक कमेंट आकाशच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.

Leave a Reply