‘फक्त प्रमोशनसाठी लग्न करता तेव्हा….’ कंगनाने बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीवर साधला निशाणा….

मनोरंजन

कंगना रनौतला बॉलिवूडची पंगा गर्ल म्हटले जाते. कंगना रनौत स्पष्टवक्ती आहे. आपल्या मनातलं बोलायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. म्हणूनच अभिनेत्रीचे इंडस्ट्रीत मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. आता कंगनाने एक पोस्ट लिहीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने नाव न घेता आलिया आणि रणबीर वर गंभीर आरोप केले आहेत. या जोडप्यानं तिची चुकीची माहिती पसरवली असल्याचं तिचं म्हणणं आहे. कंगनाने निशाणा साधलेलं बॉलिवूडचं हे जोडपं नक्की कोण आहे जाणून घ्या.

   

नुकतीच कंगना रनौतने अशी एक पोस्ट शेअर केली, जी पाहून सगळेच थक्क झाले. या पोस्टमध्ये, अभिनेत्रीने एका जोडप्याच्या लग्नाविषयी निशाणा साधला असून ते खोटं नातं असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर तोच अभिनेता तिला भेटण्यासाठी भीक मागत होता, असंही अभिनेत्रीनं लिहिलं आहे.

हे वाचा:   तिसऱ्यांदा आई होण्याच्या बातमीने करीना कपूरचे अश्रू अनावर, म्हणाली- 'मला खूप वेदना होत आहेत'

कंगना रनोटने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बॉलिवूडमध्ये असं एक जोडपं आहे जे लोकांसमोर आनंदी पती-पत्नी असल्याचं भासवतात पण प्रत्यक्षात मात्र ते वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. ते माझ्या चित्रपटांबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत.” असा खुलासा कंगनाने केला आहे. मात्र, कंगनाने या पोस्टमध्ये कुठेही या जोडप्याच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी यावरून हे जोडपं रणबीर आणि आलिया भट्ट असल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “हे जोडपं आणि त्यांची मुलगी बाहेर खूप आनंदी असल्याचं दाखवतात पण नुकतंच या कोटुंबिक कार्यक्रमापासून सुनेला आणि नातीला वंचित ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. तो पती मला भेटण्यासाठी भीक मागत आहे. या फेक जोडप्याचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे.”असं तिने म्हटलं आहे. अभिनेता रणबीर कपूर अलीकडेच त्याची आई नीतू कपूरला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी लंडनला पोहोचला होता, पण यावेळी आलिया आणि राहा मात्र अनुपस्थित होती.

हे वाचा:   बाबो.! 51 वर्षाच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो पाहून तुमच्या भुवया उंचावल्या जातील, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ.!

कंगना रणौत एवढ्यावरच थांबली नाही तर ती म्हणाली, “फक्त पैसे आणि प्रमोशनसाठी लग्न केलं आहे. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केलं आहे. या लग्नामुळे अभिनेत्याला एक सिनेमा मिळाला आहे. पण आता दोघेही या फेक लग्नापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता अभिनेत्याने पत्नी आणि लेकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा भारत आहे. एकदा लग्न झालं की झालं. आता तरी सुधरा.” असं कंगनाने म्हटलं आहे. कंगना राणौतची ही पोस्ट समोर आल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले असून अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply