लहान मुलीनं केला ऐश्वर्या रायचा ‘तो’ सीन रिक्रिएट, अभिनय पाहून लोकं म्हणाले, “बॉलीवूडमध्ये गाजणार”

मनोरंजन

संजय लीला भंसाली दिग्दर्शित देवदास चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी केलेलं अप्रतिम अभिनय आणि माधुरी दिक्षीतचा मंत्रमुग्ध करणारा डान्स या चित्रपटाची खासीयत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी काही सीन्स रिक्रिएट करण्याचा प्रयत्नही केला आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

   

अशातच आता एक लहान मुलीनं देवदास चित्रपटाचा जबरदस्त सीन रिक्रिएट करून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कियारा खन्ना असं या मुलीचं नाव असून चित्रपटांच्या अवघड मोनोलॉगचं रिक्रिएशन करण्यात माहिर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. कियाराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, देवदास चित्रपटातील एक सीनला कियाराने अप्रतिम अभिनय करून रिक्रिएट केलं आहे. पारो (ऐश्वर्या राय) आणि देव (शाहरुख खान) यांच्यात सुरु असलेला संवाद कियाराने तिच्या अभिनयाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, #चित्रपट#devdas मधली पारो…@aishwaryaraibachchan_arb यांचा संजय लीला भंसाली यांच्या देवदास चित्रपटातील अभिनय जबरदस्त आणि उल्लेखनीय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Myra and Kiara (@myrakiarakhanna)

या दुख:द, रोमॅन्टिक कहाणीमध्ये ती लालित्य, सौंदर्य आणि वेदना प्रदर्शित करते. त्यांचा अभिनय दृढ संकल्पाला प्रभावीपणे व्यक्त करण्यासारखा आहे. या पोस्टला आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांने प्रतिक्रियांचा वर्षाव करत या मुलीचं कौतुक केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं की, बॉलिवूडमध्ये कियाराचं भविष्य उज्ज्वल असेल.

हे वाचा:   नागराज मंजुळे घेऊन येणार या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग; चाहत्यांची उत्सुकता वाढली

Leave a Reply