अभिनेत्री स्वानंदीनं दिली आपल्या प्रेमाची कबुली; खुपच टॅलेंटड आहे टिकेकरांचा होणारा जावई..!

मनोरंजन

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकरनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. गायक, अभिनय, सुत्रसंचानल अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्वानंदीनं काम केलं. आईकडून गाणं तर वडिलांकडून तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे. उदय आणि आरती टिकेकर यांच्या लेकीनं तिच्या नात्याची कबुली देत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. स्वानंदीनं नुकताच तिच्या जोडीदाराबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

   

स्वानंदी टिकेकरनं तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली आहे. स्वानंदी ही आशिष कुलकर्णीला डेट करतेय. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. आशिष देखील स्वानंदीच्या फिल्डचाच आहे. आशिष हा पेशानं गायक असून अनेक प्रसिद्ध रिअलिटी शोमध्ये त्यांनं सहभाग घेतला होता.इंडियन आयडिअल सीझन 12मध्ये अशिष कुलकर्णी दिसला होता. इंडियन आयडिअलमुळे त्याला नवी ओळख मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून स्वानंदी आणि आशिष रिलेशनमध्ये आहेत.

हे वाचा:   प्रसिद्ध खलनायक डॅनी डेन्झोंगपाने सिक्कीमच्या राणीशी लग्न केले, पत्नी आहे मुलीपेक्षा सुंदर

“हे आम्ही आहोत. #प्रेम #आमचं_ठरलंय!” असं कॅप्शन देत स्वानंदीनं तिचा आणि आशिषचा क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर स्वानंदी आणि आशिष यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्री रसिका सुनील, गायक राहुल देशपांडे, गौतमी देशपांडे, प्रियांका बर्वे, हर्षदा खानविलकर, सुयश टिळक आणि कलाक्षेत्राशी निगडीत अनेकांनी स्वानंदी आणि आशिषला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर स्वानंदी ही पेशानं गायिका आहे. त्याचप्रमाणे ती उत्तम अभिनेत्री आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत तिनं बिनधास्त मीनलची भुमिका साकारली होती. त्यानंतर ती काही शोचं सुत्रसंचानल करताना दिसली होती. नुकतीच अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका सुरू होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

तर आशिष कुलकर्णीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर 2008मध्ये आशिष झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये दिसला होता. पण लवकर इविक्ट झाला होता. त्यानंतर 2015मध्ये त्यानं त्यांच्या मित्रांबरोबर ‘रागालॉजिक’ नावाचा त्याचा ब्रँड सुरू केला. आशिष अनेक प्रसिद्ध म्युझिक बँडबरोबर परफॉर्म करत असतो. 2019मध्ये त्यानं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलवर तो त्याचे अनप्लग गाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत असतो.

Leave a Reply