कास्टिंग काऊच बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा म्हणाली; ‘त्याला माझ्यासोबत रात्र घालवायची होती…’

मनोरंजन

शाहरुखच्या ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री म्हणजे सुचित्रा कृष्णमूर्तीसध्या चर्चेत आहे. मधल्या काही काळात ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता तिने पुन्हा कमबॅक केलं असून ओटीटीवर आपल्या अभिनयानं लोकांचं मनोरंजन करत आहे. सुचित्राने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. सुचित्राने आपल्यापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं होतं पण नंतर तिचा घटस्फोट झाला. तब्बल 16 वर्षांनंतर आता सुचित्राने शेखरसोबतच्या लग्नाच्या कटू आठवणींबद्दल खुलासा केला. आता सुचित्राने कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

   

सुचित्रा कृष्णमूर्ती हिने बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांपैकी एक असलेला शेखर कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आता घटस्फोटानंतर इतक्या वर्षांनी सुचित्राने शेखरवर अनेक आरोप केले. आता तिने तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की चित्रपट निर्मात्याला तिच्यासोबत हॉटेलमध्ये रात्र घालवायची होती पण तीने लवकरच तिथून पळ काढला.

हे वाचा:   सलमान खानला शाहरुख खानचं घर घ्यायचं होतं, बोली लावली होती, पण नंतर झालं

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने तिच्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, मी या निर्माता-दिग्दर्शकाला भेटले होते. त्यावेळी हॉटेल्समध्ये अशा मिटींग्स व्हायच्या. त्या काळात हे खूपच नॉर्मल होतं. ती पुढे म्हणाली, ‘त्या माणसाने मला पुन्हा विचारलं, तू तुझ्या आई की वडिल कोणाच्या सर्वात जास्त कोणाच्या जवळ आहेस? मी उत्तर दिलं, मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे. त्यावर तो म्हणाला खूप छान, मग तुझ्या वडिलांना फोन करून सांग की मी तुला उद्या सकाळी घरी सोडतो.’

सुचित्राने पुढे सांगितले की, हे ऐकताच तिला रडू कोसळले. तिने तिचे सर्व सामान उचलले आणि त्याला सांगितले की, ‘मी लगेच वापस येते.’ असं सांगून तिनं तिथून पळ काढला. सुचित्रा म्हणाली, ‘सुरुवातीला मला ते नेमकं काय बोलत होते ते समजलं नाही. पण त्यांना हे समजायला वेळ लागला. मग मी विचार केला की आता फक्त ४-५ वाजले आहेत, उद्या सकाळपर्यंत त्यांच्यासोबत काय करू. त्यानंतर त्याचा त्यांना नेमकं काय हवं होतं याचे इशारे द्यायला त्यांनी सुरुवात केली. पण त्या काळात हे खूप व्हायचं.’ असा खुलासा या अभिनेत्रीनं केला आहे.

हे वाचा:   Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकून तुम्हाला पण येईल चक्कर

सुचित्राला 1994 मध्ये आलेल्या ‘कभी हान कभी ना’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. चित्रपट निर्माता शेखर कपूरसोबत लग्न केल्यानंतर सुचित्राने चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेतला होता.

Leave a Reply