“मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे”; शाळेत असताना स्मिता गोंदकरला मित्राने केलेलं प्रपोज, अभिनेत्री म्हणालेली….

मनोरंजन

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या फोटोशूटमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. नृत्याबरोबरच तिच्या फॅशन स्टाइलचेही हजारो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच वाढ झाली. नुकतच एका मुलाखतीत स्मिताने तिच्या शालेय जीवनातील एक किस्सा सांगितला आहे. शाळेत असताना पहिल्यांदा एका मुलाने तिला प्रपोज केलं होतं. त्यावर आपली काय प्रतिक्रिया होती. याबाबतचा खुलासा तिने केला आहे.

   

स्मिता म्हणाली, “शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं. तो मला म्हणालेला मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे. मला त्यावेळेस काही कळालच नाही. मी म्हणाले म्हणजे काय तू माझा मित्रच आहेस ना. तो मुलगा माझ्या ओळखीचाच होता. मी त्यावेळी एवढी ओपन किंवा बोल्ड नव्हते. मी त्यावेळी लाजून वगैरे काय बोलतोय असं म्हणून गेले होते. नंतर त्याच्या वर्गातल्या मुलांनी मला खूप चिडवलं होतं. मला ते अजिबात आवडायचं नाही. त्याला तोंडावर जाऊन बोलावं एवढीही हिंमत नव्हती माझी.”

हे वाचा:   Video: लडकियो वाला स्वॅग! मुलींचे वनपीस घालत पोरांचा सोशल मीडियावर राडा..

स्मिता गोंदकरने अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मुंबईचा डब्बेवाला या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ये रे ये रे पैसा २ चित्रपटात स्मिता गोंदकरने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘मिस्टर अँड मिसेस अनवाँटेड’ या चित्रपटासाठी तिला कॅनडा टोरंटोमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्मिता गोंदकरने अमेरिकेत डिझनी क्रूझ लाइन या जहाजावर सुद्धा काम केले आहे.

२००९ साली स्टंट मेनिया स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत पोहोचणारी ती एकमेव महिला स्पर्धक आहे. स्मिताला हॉलिवूड मधल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. स्मिता ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. बॉसच्या पहिल्या सीझनच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता.

Leave a Reply