…अन् भर रस्त्यामध्ये शाहिद कपूर पापाराझींवर चिडला, पहा नेमकं काय घडलं.?, व्हिडीओ व्हायरल….

मनोरंजन

बॉलीवूड कलाकारांना पापाराझी अनेक ठिकाणी फॉलो करत असतात. घराबाहेर असो किंवा विमानतळावर बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दलचे प्रत्येक अपडेट विविध इन्स्टाग्राम पेजवर नेटकऱ्यांना पाहायला मिळतात. अनेकदा या कलाकारांचे पापाराझींबरोबर वाद होतात. अभिनेता शाहिद कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

   

अभिनेता शाहिद कपूर भर रस्त्यात पापाराझींवर भडकल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. शाहिद पत्नी मीरा राजपूत आणि संपूर्ण कुटुंबासह बाहेर जात असताना पापाराझींनी त्याला मोठमोठ्याने आवाज देण्यास सुरुवात केली.

शाहिद उपस्थित पापाराझींना हळू बोला, ओरडू नका असं सांगत होता. अभिनेता म्हणाला, “मी गाडीतून जातोय आणि तुम्ही ओरडत आहात हे मी समजू शकतो परंतु, उगाच असं ओरडू नका…मी इथेच उभा आहे.” हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे वाचा:   मैत्री अशी आहे: महिलेने तिच्या मैत्रिणीचे तिच्या पतीशी लग्न केले,दोघींनाही नव्हते राहायचे एकमेकांपासून दूर

शाहिद कपूरचा राग पाहून उपस्थित सगळेच शांत झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. एका युजरने, “शाहिदने अगदी बरोबर केल” अशी प्रतिक्रिया कमेंटमध्ये दिली आहे. दरम्यान, शाहिद कपूर शेवटचा ब्लडी डॅडी चित्रपटात दिसला होता. लवकरच तो आगामी चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Leave a Reply