सध्या सर्वत्र रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा बाजार तापला आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत आणि बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटात रणबीरसोबत काही बोल्ड सीन्स देणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीही चर्चेत आली आहे. तृप्ती डिमरीला तिच्या आधीच्या चित्रपटांमध्ये तितकी ओळख मिळाली नाही जितकी ओळख या सीन्स मुळे मिळाली.
रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट आधीच चर्चेत होता. सेन्सॉर बोर्डाने अॅनिमलला अ”ड”ल्ट प्रमाणपत्र दिले असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. ट्रेलरनंतर चित्रपटात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची चर्चा होती, परंतु चित्रपट पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची अॅनिमलमधील भूमिका.
तृप्ती दिमरी जास्त काळ अॅनिमल चित्रपटात दिसली नाही पण तिने उत्तरार्धात तिच्या पात्राने खळबळ उडवून दिली. अॅनिमलच्या उत्तरार्धात तृप्तीने रणबीर कपूरसोबत एक लव्ह मेकिंग सीन केला आहे, ज्यामध्ये तृप्ती आणि नायक दोघेही बिछान्यात न”ग्न अवस्थेत दिसत आहेत.
चित्रपटातील या दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या दृश्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील या दृश्याची क्लिपिंग व्हायरल झाली आणि आता लोक शोधत आहेत की तृप्ती डिमरी कोण आहे? रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात कॅरेक्टर आर्टिस्टची छोटीशी भूमिका साकारणारी तृप्ती याआधी चार चित्रपटांमध्ये नायिका म्हणून दिसली आहे. त्यांची कारकीर्द सहा-सात वर्षांची आहे.
श्रीदेवीच्या शेवटच्या चित्रपट मॉममध्ये ती पहिल्यांदा छोट्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या पोस्टर बॉईज चित्रपटात दिसली, परंतु तिच्या करिअरला मोठी चालना मिळाली जेव्हा दिग्दर्शक इम्तियाज अलीने तिला लैला-मजनून या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. पण हे चित्रपट फ्लॉप ठरले.
यानंतर तृप्तीने OTT वर प्रदर्शित झालेल्या बुलबुल (2020) आणि काला (2022) या दोन चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या. दोन्ही कथा त्यांच्याभोवती फिरतात. दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले, परंतु मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांची ओळख झाली नाही. आज तृप्ती अॅनिमलमुळे सतत चर्चेत असते.