2012 साला पासून अगदी सावली प्रमाणे शाहरुख खान सोबत असणारी नक्की ही महिला आहे तरी कोण..?

मनोरंजन

माणसाने एकदा यशाच्या उंच शिखरावर भरारी घेतली की त्याच्या जवळ छोट्या मोठ्या कामांसाठी अजिबात वेळ काढता येत नाही. सोबतच त्याला वेळे सोबत बांधिल हे राहावेच लागते. बॉलीवूड इंडस्ट्रीचा ‘बादशाह’ शाहरुख खान यांना आज कोण ओळखत नाही. संपूर्ण जग हे शाहरुखच्या अभिनयाला सलाम करते. छोट्या पडद्यावर काम करत करत तो आत बॉलीवूड सिने सृष्टीचा बादशहा झाला आहे.

   

हे सर्व त्याने आपल्या मेहनत आणि सोबतीला असणार्‍या चांगल्या माणसांच्या मदतीने कमावले आहे. मित्रांनो शाहरुख खान हा आपल्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ही नेहमी चर्चेत असतो. शाहरुख खान याचा हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत समावेश होतो. कोट्यवधींच्या ‘मन्न’ नावाच्या बंगल्या पासून त्याच्याकडे अनेक आलिशान वाहने आहेत. सध्या शाहरुख खानला कशाचीही कमतरता नाही.

शाहरुख खान याचा वेळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर तो बारीक सारीक गोष्टींकडे वेळ देत राहिला तर त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. मित्रांनो तर शाहरुख सोबत नेहमी दिसणाऱ्या एका महिलेला तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्याची कोणती ही पार्टी असो किंवा फंक्शन व इव्हेंट तसेच चित्रपटाच्या शूटिंगपर्यंत ही महिला त्याच्यासोबत दिसते. अशा वेळी आपल्या पैकी प्रत्येक जण हा विचार नक्की करेल की नक्की ही महिला कोण आहे..? आज आम्ही तुम्हाला याच महिलेला बद्दल काही माहीत सांगणार आहोत, ती शाहरुख खानसोबत रात्रंदिवस का दिसते आणि तिचे काम काय आहे या बद्दल देखील आपण खोलवर जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   कुणी से'क्सची मागणी केली, कुणी म्हटलं मसाज दे ? राधिका आपटेचे बॉलीवूड बद्दल खळबळजनक खुलासा

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची मॅनेजर पूजा ददलानी आहे जी जवळपास 10 वर्षांपासून त्याच्यासोबत काम करत आहे. मित्रांनो पूजा ददलानी बॉलिवूड इंडस्ट्रीतील इतर मोठ्या स्टार्स प्रमाणेच लोकप्रिय आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये काम करणार्‍या इतर बड्या स्टार्ससोबत देखील ती दिसते. शाहरुख खानशी संबंधित प्रत्येक काम पूजेच्या माध्यमातून केले जाते. एवढेच नाही तर शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीला कामासाठी करोडोंचा पगारही देतो.पूजा ददलानीच्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर देखील चांगलीच प्रसिद्ध आहे.

जर तुम्ही तिच्या अकाऊंट वर नजर टाकली तर तुम्हाला हे देखील दिसून येईल की ती शाहरुख खानसोबत तिचे सर्वाधिक फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर शाहरुख खानही अनेकदा पूजा ददलानी सोबत दिसतो. विशेष म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात असताना पूजा बदलानी त्याच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याच्यासोबत उभी असल्याचे दिसले. त्या दरम्यान तिने शाहरुख खानच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले.आर्यन खानला भेटण्यासाठी ती थेट जेल मध्येही पोहोचली होती.

शाहरुख खान सोबत काम करून पूजा दरवर्षी सात ते आठ कोटी कमवते. आमचे सूत्र आम्हाला सांगतात की पूजाची एकूण संपत्ती ही ४५ ते ५० कोटींच्या आस पास आहे. या प्रमाणे जर हिशोब केला तर पूजा आपल्या कामाचे दर महिन्याला ६६ लाख रुपये घेते. पूजा हिचे नाव किंग खान सोबत 2012 पासून जोडले गेले आहे.या तूनच एक योगा योग म्हणजे शाहरुख खान आणि पूजा यांचा जन्मदिवस देखील एकाच दिवशी येतो. दोघे ही २ नोव्हेंबरला आपला वाढदिवस मन्नत या शाहरुख खानच्या बंगल्यात साजरा करतात.

हे वाचा:   इतकी मोठी आणि सुंदर झालेय दंगल चित्रपटातील लहान बबिता; हिच्या सौंदर्यासमोर सारा आणि जान्हवीसुद्धा फिक्या आहेत..

या सोबतच शाहरुख खान याची आई.पी.एल. टीम कोलकाता नाइट रायडर्स याच्या संबंधित सगळे खर्च व काम देखील पूजा बघते. पूजा ददलानी यांनी काही वर्षांपूर्वी आलेली शाहरुख खान आणि दिपीका पदुकोण यांची सुपरहिट फिल्म ‘ चेन्नई एक्सप्रेस ‘ प्रोड्यूस केली होती. पूजा ददलानी या विवाहित आहेत आणि त्यांच्या पतीचे नाव हितेश गुरनानी असे आहे. या दोघांना एक गोंडस मुलगी देखील आहे. पूजा नेहमी आपल्या मुलीचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट करत असते.

मित्रांनो शाहरुख खान याची पत्नी म्हणजे गौरी खान यांच्या सोबत देखील पूजाचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या मध्ये मैत्रीचे एक घट्ट नाते निर्माण झाले आहे. अनेक वेळा या दोघी खरेदी साठी मोठ मोठ्या शॉपिंग मॉल आणि सेंटर मध्ये देखील जातात. शाहरुख खान याची मुलगी सुहाना देखील पूजा यांच्या खूप जवळची आहे. तिच्या करियर मध्ये पूजा तिला अनेक प्रकारे गाईड करताना दिसून येतात.

Leave a Reply