‘गाडी पाठवतो, लगेच हॉटेलवर ये…’ दिग्दर्शकाची ती मागणी ऐकून घाबरली अभिनेत्री; म्हणाली ‘मी ढसाढसा रडले आणि…’

मनोरंजन

अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा ‘जुदाई’ हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता. हा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याच चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच सहाय्यक कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. या सिनेमात एका श्रीदेवी आणि उर्मिला यांच्यासोबत एका सहाय्यक अभिनेत्रीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं ती म्हणजे उपासना सिंग. या अभिनेत्रीनं आजवर मुख्यतः विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. या चित्रपटातील तिचा ‘अब्बा डब्बा छब्बा’ हा डायलॉग तुफान हिट झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या. आता नुकतंच या अभिनेत्रीनं सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या दिवसांविषयी खुलासा केला आहे.

   

अभिनेत्री उपासना सिंग गेली चार दशकं बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. तिची ‘जुदाई’ चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. राज कंवर दिग्दर्शित या चित्रपटात उपासनाने दुहेरी भूमिका साकारली होती. एवढंच नाही तर ‘जुदाई’ इतका गाजला की त्यानंतर लोक उपासना यांना खऱ्या नावाऐवजी ‘अब्बा डब्बा छब्बा’ म्हणून ओळखू लागले.

हे वाचा:   वॉचमनच्या नोकरीपासून ते यशस्वी अभिनेत्यापर्यंत, पहा नवाजुद्दीन सिद्दीकीचे कधीही न पाहिलेले फोटो....

आता नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत उपासना सिंग यांनी साऊथ चित्रपटसृष्टीत आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. उपासनासाठी मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणं सोपी गोष्ट नव्हती. याविषयी अभिनेत्रीनं सांगितले की, ‘एक काळ असा होता जेव्हा एका भयानक घटनेनंतर मी चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. मी नाव घेणार नाही पण एका साऊथच्या दिग्दर्शकानं मला अनिल कपूरसोबत एका सिनेमात कास्ट केलं होतं. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. मी माझ्या जवळच्या लोकांना याबद्दल सांगितलं होतं. पण नंतर एके दिवशी या दिग्दर्शकानं मला रात्री उशिरा फोन केला आणि हॉटेलमध्ये मीटिंगसाठी बोलावलं, त्यावेळी मी फक्त 17 वर्षांची होते.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला काय बोलावं तेही समजत नव्हतं. त्यांना मी दुसऱ्या दिवशी येईन’ असा निरोप दिला. कारण माझ्याकडे तिथं जाण्याचं कोणतंही साधन नव्हतं. मग तो मला म्हणाला, ‘मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो’. त्यानंतर तो दिग्दर्शक म्हणाला, तुला सीटिंग म्हणजे काय माहित नाहोये का? बॉलिवूडमध्ये येणाऱ्या प्रत्येकीला हे करावंच लागतं. मला समजलं त्याला काय म्हणायचं होतं. नंतर मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला खडसावलं. पण त्यामुळं अनिल कपूरचा ‘मुझे’ हा चित्रपटमाझ्या हातून गेला. त्यासाठी मला खूप वाईट वाटलं आणि मी खूप रडले.’ असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Upasana Singh (@upasnasinghofficial)

उपासना पुढे म्हणाली, ‘मी त्याला सांगितले की तू माझ्या वडिलांच्या वयाचा आहेस आणि तू माझ्याबद्दल विचारही कसा करू शकतोस. या घटनेनंतर मी 7 दिवस घराबाहेर पडले नाही आणि खूप रडत होते. पण, आईने मला धीर दिला.’

Leave a Reply