दोन वेळा संसार मोडलेला असताना आता 10 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री.?

मनोरंजन

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता तिवारीचं व्यावसायिक आयुष्य यशस्वी झालं असलं तरी तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षमय राहिलं. अभिनेत्रीने दोन लग्ने केली आहेत. मात्र तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली आहेत. सध्या श्वेता आपली लेक पलक आणि मुलासोबत राहत असून सिंगल आयुष्य जगत आहे. पण श्वेता तरीही नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी तिचा एका अभिनेत्यासोबत व्हॅकेशनमधील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता श्वेता तिवारी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर अभिनेत्यानं अखेर मौन सोडलं आहे.

   

वयाच्या चाळीशीत असलेली श्वेता तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही चाहत्यांचं लक्ष असतं. मध्यंतरी श्वेताचा अभिनेता फहमान खानसोबत एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. एवढंच नाही तर श्वेताचा एक्स नवरा अभिनव कोहलीने देखील असाच खुलासा केला होता. त्यानंतर आता अभिनेता फहमान खानने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

हे वाचा:   सलमानसोबत झळकणाऱ्या या अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; आजारपणात करतेय 'हे' काम..

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला हा पप्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, ‘हे साफ खोटं आहे. आमच्यात असं काहीच नव्हतं. आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचं लोक म्हणून लागले तेव्हा आम्ही दोघे एकत्र बसून या बातम्यांवर हसायचो. मी श्वेताला माझी गुरु मानतो, त्यामुळे आमच्यात असं काही असण्याचा प्रश्नच नाही.’ असं म्हणत अभिनेत्यानं या चर्चा फेटाळल्या आहेत.

श्वेता तिवारीने 1998 मध्ये अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. हे टीव्हीवरील प्रसिद्ध जोडपं होतं. परंतु त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. श्वेता तिवारीने पती राजा चौधरीवर आपला कौटुंबिक छळ करत असल्याचा आणि आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकारानंतर 2007 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता . या दोघांना पलक ही मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

त्यांनतर श्वेता तिवारीने अभिनेता अभिनव कोहलीसोबत लग्न केलं होतं. काही काळ या दोघांनी व्यवस्थित संसार केला. नंतर त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. लग्नानंतर काही वर्षातच दोघे विभक्त झाले. परंतु त्यांना रेयान नावाचा एक मुलगा आहे. या मुलाच्या कस्टडीसाठी त्यांच्यामध्ये वाद देखील झाला होता. सध्या श्वेता एक सिंगल मदर म्हणून आपलं आयुष्य जगत आहे. श्वेता तिची मुलगी पलक आणि रेयान सोबत राहते.

Leave a Reply