‘तिला माझ्या परवानगीची गरज नाही…’, ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल..!

मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकतीच अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या एका पोस्टला लाईक केलं त्यामुळे या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात देखील अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी वेगवेगळी उपस्थिती दर्शवली होती.

त्यात अभिषेकनं घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केल्यामुळे चर्चा चांगल्याच वाढल्या आहेत. दुसरीकडे अभिषेकचं एक जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिषेकनं ऐश्वर्याविषयी त्याच्या मनातली गोष्ट लिहीली होती.

खरंतर अभिषेकनं ‘पोन्नियिन सेलवन 2’ साठी तिचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ऐश्वर्यानं पझुवूरची राणी नंदिनीची भूमिका साकारली होती. त्यासाठी अभिषेकनं ट्वीट केलं होतं की “#PS2 खूप चांगला आहे!!! आता यासाठी शब्द नाहीत. हा चित्रपट खूप भव्य आहे. संपूर्ण टीम आणि इतर कलाकार आणि क्रु सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या पत्नीवर खूप गर्व आहे. आता पर्यंतचा ऐश्वर्या राय बच्चनचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.”

हे वाचा:   पत्नीनंतर Shahid Kapoor सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करायच्या तयारीत? अखेर तिला Propose केलंच

अभिषेक बच्चनच्या या ट्वीटवर चाहत्यानं लिहिलं की ‘जसं तू करायला हवं. आता तिला आणखी चित्रपट साईन करू द्या आणि तू आराध्यावर लक्ष ठेव.’ अशात अभिषेक गप्प कस बसणार त्यानं लगेच त्या नेटकऱ्याला उत्तर दिलं. ‘तिला साईन करू द्या? सर, तिला नक्कीच कोणतीही गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीती गरज नाही. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला जे आवडतं ते करण्यासाठी मुळात तिला माझ्या परवानगीची गरज नाही.’

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाला अर्थात 12 जुलै रोजी भारतातून आणि परदेशातून अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला.

तर ऐश्वर्या ही फक्त तिची लेक आराध्यासोबत स्पॉट झाली. त्यावरून देखील या चर्चा रंगल्या होत्या की ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात काही बिनसलं आहे. आता पुन्हा एकदा अभिषेकनं घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केल्यानंतर सगळीकडे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. मात्र, त्या दोघांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे वाचा:   “…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाहीत”; प्राजक्ता माळीने सांगितले कारण....

 

Leave a Reply