सोन्याचे वर्क असलेल्या अनंत अंबानीच्या स्नीकर्सने वेधलं लक्ष, ‘इतकी’ आहे विदेशी शूजची किंमत.!

मनोरंजन

अखेर अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांची लग्नगाठ बांधली गेली आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये १२ जुलैला रात्री मोठ्या धूमधडाक्यात अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी लेक राधिका आता अंबानींची सून झाली आहे. अनंत-राधिकाच्या या शाही लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते.

   

विशेष म्हणजे विदेशातील पाहुण्यांनी खास भारतीय पोशाख परिधान केला होता. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नातील फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण अशातच अनंत अंबानीच्या लग्नातील एका हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकमध्ये तो स्नीकर्सवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनंतच्या या लूकची चर्चा होतं आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नात वेगवेगळ्या लूकमध्ये अनंत पाहायला मिळाला. वरातीसाठी अनंतने केशरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. ज्यावर मुकेश अंबानींच्या लाडक्या मुलाने स्नीकर्स घातले होते. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वतःच्याच शाही लग्नसोहळ्यात अनंतला स्नीकर्सवर पाहून अनेकांना नव्वल वाटलं. पण अनंतच्या या स्नीकर्सची किंमत लाखोंमध्ये आहे.

हे वाचा:   इंजेक्शन लावून ४ वर्षातच मोठी झाली होती हि अभिनेत्री ; लीक व्हिडीओ ने उडालेली खळबळ.!

आजकाल स्नीकर्स खूप ट्रेंडमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या लग्नात आणि रिसेप्शनमध्ये स्नीकर्स घालत असतात. हाच ट्रेंड अनंत अंबानीने फॉलो केला आणि स्वतःच्या लग्नासाठी त्याने खास हे स्नीकर्स पॅरिसहून मागवले. माहितीनुसार, प्रसिद्ध शूज ब्रँड असलेल्या Berlutiचे हे स्नीकर्स आहेत. Berlutiच्या अधिकृत वेबसाईटवर या स्नीकरचं नाव ‘फास्ट ट्रॅक स्क्रिटो लेदर स्नीकर’ (Fast Track Scritto Leather Sneaker) असं आहे. हे स्नीकर तयार करण्यासाठी वेनेजिया लेदरचा वापर केला गेला आहे. या स्नीकरची किंमत जवळपास १.६७ लाख रुपये आहे.

एवढंच नव्हे तर नवरदेव अनंत अंबानीच्या लूकसाठी हे स्नीकर्स खास तयार केले आहेत. यामध्ये सोन्याचा वापर करून त्यावर वर्क केलं आहे. त्यामुळेच स्नीकर्स शेरवानीवर आणखी चांगले उठून दिसत आहेत.

हे वाचा:   जयाप्रदा यांच्या खोलीत जाताच राजेश खन्ना यांनी लावली कडी, २ तासानंतर दिसले असे दृश्य.!

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता.

त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.

Leave a Reply