अक्षया देवधर लवकरच देणार आनंदाची बातमी.. त्या एका पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता.!

मनोरंजन

छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अक्षया देवधर. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मालिकेतील पाठक बाई अक्षयानं इतकी उत्तम रंगवली की ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. काही दिवसांपूर्वी अक्षयाने हार्दिक जोशीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अक्षया गेली अनेक दिवस मालिकाविश्वातून गायब आहे. पण ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता अक्षयाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

   

लग्नानंतर अक्षया गेली अनेक दिवस मालिकाविश्वातून गायब आहे. पण ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. अक्षयाचा मोठा चाहतावर्ग असून ती चाहत्यांसोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

आताही अक्षया हिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षया येत्या ३१ जुलैला मोठी घोषणा करणार आहे. आता अक्षया नेमकं काय सांगणार याकडं आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा:   जिला छोटी-मोठी अभिनेत्री समजत होतो ती निघाली जुही चावलाची खरी बहीण, फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

अक्षयानं शेअर केलेल्या प्रत्येकाची स्वप्नं असतात… तसच माझही अनेक स्वप्नांमधलं हे एक मोठ्ठं स्वप्न होतं. ते लवकरच पूर्णत्वास येतय…काय आहे…? कुठे आहे…? कधी आहे…? सर्व सांगते..! ‘31 जुलै 2024’ ला.’ असं म्हटलं आहे.

तसंच तिने या पोस्टमध्ये, ‘या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय…तुमची साथ कायम असेल याची खात्री आहे.’ असं म्हटलं आहे. आता अक्षया नक्की काय सांगणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.

या व्हिडिओत अक्षया तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट बी’ बद्दल बोलताना दिसत आहे. एका फ्लॅटमध्ये इंटिरअरचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पण अक्षया आता कशाची सुरुवात करणार आहे? हे मात्र तिनं सांगतिलं नाहीये.

Leave a Reply