“१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

Uncategorized

‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदवर शर्लिन चोप्रासह अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्याची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

   

साजिद खानवर अभिनेत्री आहाना कुमरानेही २०१८ साली मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. साजिद खानने आहानाला ऑडिशनसाठी घरी बोलवलं होतं. एका मुलाखतीत तिने या प्रसंगाचा उल्लेख केला होता. “साजिद खानबरोबर मीटिंग होती त्यासाठी एका वर्षापूर्वी मी त्याच्या घरी गेले होते. साजिदने मला त्याच्याबरोबर घरातील एका अंधाऱ्या खोलीत नेलं. त्या खोलीत तो जे बघत होता तेच मलाही बघायला लावलं”, असं ती म्हणाली होती.

“साजिद मला खूप घाणेरडे प्रश्न विचारत होता. माझी आई पोलिस अधिकारी आहे. हेही मी त्याला सांगितलं होतं. जेणेकरुन तो घाबरुन मला असे प्रश्न विचारणं बंद करेल. पण तरीही तो मला घाणेरडे प्रश्न विचारत होता. मी तुला १०० कोटी देतो. कुत्र्याबरोबर सेक्स करशील का? असंही त्याने मला विचारलं होतं. मी मूर्ख आहे, असं त्याला वाटत होतं. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन, असं त्याला वाटलं होतं”, असा खुलासा आहानाने मुलाखतीत केला होता.

हे वाचा:   आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हीही कराल कौतुक

साजिद खान तिला अश्लील मेसेज करत असल्याचा आरोपही आहानाने केला होता. “तू बिकिनीमध्ये खूप हॉट दिसतेस”, असा साजिदने मेसेज केल्याचा खुलासा आहानाने केला होता. कलाविश्वातील कास्टिंग दिग्दर्शक अभिनेत्रींबरोबर चुकीचं वर्तन करत असल्याचंदेखील ती म्हणाली होती. अभिनेत्रींना हॉट कपड्यांमध्ये बघण्याची इच्छा ते व्यक्त करत असल्याचा खुलासा आहानाने मुलाखतीत केला होता.

Leave a Reply