कंपनीची मालकीण ऑफिस बॉयला म्हणाली ‘तुझ्यात जीव रंगला’, अनोखी Love Story

Uncategorized

Trending News : असं म्हणतात की प्रेम आंधळ असतं. प्रेमात श्रीमंत-गरीब, जात-पात काहिच बघितलं जात नाही. अशीच सिनेमाला साजेशी एक लव्ह स्टोरी सोशल मीडिआवर सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. लाखोंचा टर्न ओव्हर असलेल्या एका कंपनीच्या मालकीणीचा कंपनीत काम करणाऱ्या एका ऑफस बॉयवर जीव जडला. तिने त्याच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. मालकीणीच्या नातेवाईकांना हे नातं जराही पटलं नाही. त्यांनी याला विरोध केला. पण खऱ्या प्रेमासमोर त्यांना माघार घ्यावी लागली.

   

काय आहे नेमकं प्रकरण?

या तरुणीचं नाव आहे . ती एका कंपनीची मालकिन असून तिच्या कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर जवळपास 60 लाख रुपये इतका आहे. याच कंपनीत रईस नावाचा तरुण ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. रईस कंपनीतील छोटी-मोठी कामं करण्याबरोबरच चहा-नाश्ताही बनवायचा. रईस आपल्या कामाच्याबाबतीत इमानदार होता. तसंच तो दिसायलाही सुंदर होता.

शेरिस रईसच्या प्रेमात

हे वाचा:   आशुतोष राणाआधी मराठीतील या दिग्दर्शकासोबत रेणुका शहाणेंनी थाटला होता संसार; का झाला घटस्फोट?

रईस कंपनीत अगदी मनापासून काम करत असे, त्याच्या याच सवयीमुळे शेरिसला रईसबद्दल आपुलकी वाटू लागली, आणि नंतर त्यांच रुपांतर प्रेमात झालं. रईस चांगला गायकही होता. त्याच्या गाण्यावर शेरिस प्रभावित झाली. तीने आपल्या मनातील भावना रईसकडे बोलून दाखवली. रईसला सुरुवातीला विश्वासच बसला नाही, एका कंपनीची मालकिन आपल्यावर प्रेम करते, याचं रईसला आश्चर्य वाटलं. पण शेरिसने आपण मनापासून आणि खरं प्रेम करत असल्याचं त्याला सांगितलं. त्यानेही तिच्या प्रेमाचा स्विकार केला.पाकिस्तानात रहाणाऱ्या या जोडप्याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताहे. रईस हा पेशावरमद्ये रहातो. तर शेरिस लाहोरमध्ये रहाते. पाकिस्तानी युट्यूबर सैयद बासित अली याने आपल्या चॅनेवर या दोघांची एक मुलाखतही घेतली.

शेरिसच्या कुटुंबियांचा विरोध
शेरिसने रईसशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि याची माहिती तिने आपल्या कुटुबियांना दिली. सुरुवातीला कुटुंबियांनी या लग्नाला तीव्र विरोध केला. तू श्रीमंत मुलगा गरीब घरातला आहे, हे लग्न फार काळ टिकणार नाही असं तिला कुटुंबियांनी सांगितल. पण शेरिस आपल्या निर्णयावर ठाम होती.  तिच्या या निर्णयापुढे कुटुंबियांनाही माघार घ्यावी लागली आणि अखेर शेरिस आणि रईसने लग्न केलं.

हे वाचा:   पैशांची खूप गरज असेल त्यावेळी बोला हा 1 नंबर पैसा नक्की मिळेल...शास्त्रात सांगितलेला उपाय

शेरिसने रईसशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि याची माहिती तिने आपल्या कुटुबियांना दिली. सुरुवातीला कुटुंबियांनी या लग्नाला तीव्र विरोध केला. तू श्रीमंत मुलगा गरीब घरातला आहे, हे लग्न फार काळ टिकणार नाही असं तिला कुटुंबियांनी सांगितल. पण शेरिस आपल्या निर्णयावर ठाम होती. तिच्या या निर्णयापुढे कुटुंबियांनाही माघार घ्यावी लागली आणि अखेर शेरिस आणि रईसने लग्न केलं.

Leave a Reply