करिअरच्या सुरुवातीलच केलं लग्न, पण नंतर… शेवंताबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

Uncategorized

ज्या शोची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि प्रेक्षकांना उत्सुकता होती, तो बिग बॉस मराठी शो नुकताच धुमधडाक्यात सुरू झाला. १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात कैद झाले आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश करून काही तासही झाले नाहीत, तो पर्यंत वादाची मालिका सुरू झाली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक ओळखीचे चेहरे बिग बॉसच्या घरात गेले आहेत. यातील एक स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.​

   

अशी भेटली ‘शेवंता’

शेवंताच्या भूमिकेमुळं अपूर्वा घराघरात पोहोचली. तिच्या देसी ग्लॅमरची खूप चर्चा झाली पण, ‘अतिग्लॅमरमुळं तुमचं अभिनयाकडं दुर्लक्ष होऊ लागतं आणि ग्लॅमरकडंच ओढा वाढतो. मला ते करायचं नाही’, असं तिनं सांगितलं होतं. तसंत इंडस्ट्रीतल्या स्पर्धेबद्दल ती म्हणाली होती की, ‘मला तर असं कधी वाटत नाही. मी माझ्या कामामध्ये एकदम व्यवस्थित आहे. नखरे केले तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. आज कदाचित तुमचे नखरे झेलतील, पण भविष्यात तसं होणार नाही. तुमच्यासोबत नेहमी दहा जण असतात. उद्या तुमची जागा घ्यायला दुसरं कुणीतरी असेलच. शेवंताच्या भूमिकेसाठी जवळपास तीनशे मुलींनी ऑडिशन्स दिल्या होतात. त्यातून माझी निवड झाली होती.

वादाची मालिका

कोकणातील एकत्र कुटुंबातील घडामोडी आणि वाड्यातील रहस्यमय थराराचं चित्रण करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेचं तिसरं पर्वही संपलं. दुसऱ्या पर्वात सर्वाधिक गाजलेलं ‘शेवंता’ हे पात्र तिसऱ्या पर्वातही तितकंच लोकप्रिय झालं. इतक्या हिट मालिकेतून अपूर्वानं अचानक एक्झीट घेतली होती. अपुर्वानं ‘मालिका का सोडली?’ याबाबत विचारणा होऊ लागल्यावर तिनं सोशल मीडियावर खुलासा केला होती. ‘शेवंता या भूमिकेसाठी मी तब्बल दहा किलो वजन वाढवलं होतं आणि त्यानंतर मी नकारात्मक प्रतिक्रियांचासुद्धा सामना केला आहे.

हे वाचा:    'दुनियादारी चित्रपटातील शिरीनचा रोल माझा होता, पण...'; या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट

सेटवर काम करत असताना नवख्या आणि ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण वाढलेल्या वजनावर विडंबन करत माझी खिल्ली उडवली. काही प्रतिक्रिया तर जिव्हारी लागतील म्हणून जाणीवपूर्वक वारंवार करण्यात आल्या. याबाबत वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही’, असं अपुर्वानं पोस्टमध्ये लिहिलं होतं.

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सोडल्यानंतर लगेचच अपूर्वाला ‘तुझं माझं जमतंय’ ही दुसरी मालिका मिळाली होती. या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडतही होतं. पण अपूर्वानं ही देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अपूर्वानं मालिका सोडल्यानंतर यामागचं नेमकं कारण काय? याबद्दल चर्चा सुरू होत्या.अपूर्वा आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये मतभेद झाले होते. चित्रीकरणाच्या तारखांसंबंधी वादही झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं अपूर्वानं मालिकेचा निरोप घेतला होता.

‘तुझं माझं जमतंय’ या मालिका सुरू झाल्यानंतर अपूर्वालो सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होत. या मालिकेत अपूर्वा ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारणार होती. एका नेटकऱ्यानं प्रोमो पाहून ‘तुमचा लूक पाहता सगळे तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का? अशी प्रतिकिया दिली होती. ‘या मालिकेचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत? , असं म्हणत अपूर्वानं देखील त्याची शाळा घेतली होती. तसंच ‘आणि मुळात कसं आहे ना, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही नाट, असं म्हणत ट्रोल करणाऱ्याची बोलती अपूर्वानं बंद केली होती.

हे वाचा:   Rakhi Sawant Wedding : राखी सावंत आता करणार तिसरं लग्न? नववधूच्या लुकमधील फोटो झाले व्हायरल

साडी आणि ज्वेलरीचा ब्रॅन्ड

अपूर्वा फक्त अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहे असं नाही तर तिचा स्वतःचा ज्वेलरी डिझाइनचा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर ती स्वतःच्या ज्वेलरी ब्रँडचं सातत्याने प्रमोशन करत असते. एवढंच नाही तर अभिनेत्री ही एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगनादेखील आहे आणि तिला विविध नृत्य प्रकार करायला आवडतात.

लग्न आणि घटस्फोट

अपूर्वाच्या अभिनयासाठी तिचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. परंतु तिनं तिच्या खासगी आयुष्याद्दल बोलणंही नेहमीट टाळलं. पण सोशल मीडियावरील एका प्रश्न आणि उत्तरांच्या सेशनमध्ये तिनं काही महिन्यांपूर्वी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होचा. Ask me Anything या सेशनमध्ये अपूर्वानं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मनमोकळे पणानं उत्तरं दिली होती. एका चाहत्यानं तिला रिलेशनशीप स्टेटस विचारलं त्या प्रश्नाचंही तिनं खरंखरं उत्तर दिलं.एका चाहत्यानं अपूर्वाला तू सिंगल आहे की मॅरिड असा प्रश्न विचारला. यावर अपूर्वानं तिच्या मनातील खास गोष्ट शेअर केली. सध्या तरी मी सिंगल आहे, पण त्या खास व्यक्तीची (soulmate)ची वाट पाहतेय’, असं तिनं सांगितलं होतं.

अपूर्वाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती रोहन देशपांडेसोबत विवाहबंधानात अडकली होती. अडकली. पारंपरिक पद्धतीनं मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळं तिच्या रिलेशनशीपबद्दल अनेकदा चर्चा सुरू होत्या. पण तिनंही कधी याकडं लक्ष न देता अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं.

Leave a Reply