मुंबई : बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्य (abhijeet bhattacharya) हे नाव आपल्यासाठी नवीन नाही. अभिजीत हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी बॉलिवूडच्या किंग खानच्या विरोधातही अनेक गोष्टी बोलल्या होत्या. अभिजीत यांनी पाकिस्तानी गायकांचा उघडपणे निषेध केला होता. त्याचबरोबर अभिजीत यांच्यावर MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोपही करण्यात आला. आज 30 ऑक्टोबर रोजी अभिजीत यांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्याविषयी काही खान गोष्टी जाणून घेऊया…
एका फ्लाइट अटेंडंटने काही वर्षांपूर्वी अभिजीत भट्टाचार्यवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता, त्या महिलेनं असे म्हटले होते की अभिजीत यांनी ‘किस करताना त्यानं माझ्या डाव्या कानाला चावलं होतं.’ या घटनेचा संदर्भ देत महिलेने सांगितले की, ही घटना तिच्या आणि अभिजीतमध्ये 20 वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका पबमध्ये घडली होती. (singer abhijeet bhattacharya forcibly kissed the girl in the pub)
आरोपांविरोधात अभिजित यांनी महिलेचे हे दावे फेटाळून लावत म्हटले की, ‘त्यावेळी माझा जन्म झाला नव्हता. मी माझ्या आयुष्यात कधीही पबमध्ये गेलो नाही. तुम्ही मला कधीही पान 3 किंवा कोणत्याही बॉलिवूड पार्टीमध्ये देऊ शकत नाही.
अभिजीत म्हणाले की, माझ्या नावानं चर्चा होतातच. जर कोणाला त्याचा फायदा होत असेल तर ते चांगल आहे. कधी कधी माझ्या नावानं ते ब्रेड आणि बटर कमावतात, ते ठीक आहे. एका मुलाखतीत अभिजीत यांनी सांगितले की, जेव्हा मी त्याच्यासाठी (शाहरुख खान) प्लेबॅक करायचो तेव्हा तो एक रॉकस्टार होता, जेव्हा मी त्याच्यासाठी गाणं बंद केलं तेव्हा तो लुंगी डान्सवर आला होता. याशिवाय, अभिजीत यांनी सांगितलं की, ‘मैं हूं ना मध्ये त्याने स्पॉटबॉयला देखील श्रेय दिले’, परंतु त्याच्या लीड सिंगरचा आदर दिला नाही.’