दिशा वकानीच्या कॅन्सरवर सुंदरलालनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला….आजारपणाची बातमी म्हणजे निव्वळ

Uncategorized

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी हिला घशाचा कॅन्सर झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. दयाबेन या व्यक्तीरेखासाठी दिशा जो आवाज काढायची त्यामुळे तिला घशाचा कॅन्सर झाल्याचं या बातमीमध्ये नमूद करण्यात आलं. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. अनेकांनी तिच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली.

   

ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही बातमी ऐकल्यानंतर दिशाचे चाहते चिंताग्रस्त झाले. दिशाच्याआजारपणाची बातमी आल्यानंतर ई टाइम्सनं तिचा भाऊ मयुर वकानी याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यानं या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

ई टाइम्सशी बोलताना मयुरनं दिशाच्या आजारपणाची बातमी म्हणजे निव्वळ मुर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. तो पुढं म्हणाला की, ‘अशा अनेक अफवा येत असतात. परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नसते. दिशाची प्रकृती उत्तम आहे. तिला काहीही झालेलं नाही. दररोज दिशाच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तिच्या चाहत्यांनी अशा निराधार आणि बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे.’ तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत मयुर सुंदर ही भूमिका साकारत आहे.

हे वाचा:   Valentine’s Day मुळे पृथ्वी शॉचं गुपित उलगडलं, गर्लफेंडसोबत गुपचूप केलं लग्न?

दिशाच्या प्रकृतीसंदर्भात तारक मेहता मालिकेत श्रीमती रोशन सिंह सोढी ही भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तिनं सांगितलं की, ‘मी दिशाच्या संपर्कात आहे. तिची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे तिच्यासंदर्भाती जी बातमी प्रसारित झाली आहे, ती खोटी आहे.

जर असं काही असंत तर मला नक्की समजलं असतं. ऑगस्ट महिन्यातच माझं तिच्याशी बोलणं झालं. आम्ही दोघीजणी जवळच रहातो. आमच्या दोघींच्या मुली कथ्थक ला एकत्र जातात. तिथं तिची भेट होते. त्यामुळे तिच्या प्रकृतीबाबतच्या या बातम्या निराधार आहेत.’

दिशा वकानी हिच्या कार्यक्रमात परत येण्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. काहींच्या मते दिशा आता परत कार्यक्रमात दिसणार नाही. तर काहींच्या मते ती नक्की परत येईल. त्या पार्श्वभूमीवर दिशाच्या आजारपणाची बातमी आल्यानं सर्वजण चितींत झाले.

हे वाचा:   अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक, अभिनेत्री म्हणाली- तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत का

आता दिशाच्या आजारपणाची खोटी बातमी नेमकी आली कुठून हे समजायला काही मार्ग नाही. दिशा वकानी हिनं पाच वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी कार्यक्रम सोडला. त्यानंतर तिनं दुसऱ्या बाळालाही जन्म दिला. आता तरी ती कार्यक्रमात परत येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

Leave a Reply