बॉलिवूड (Bollywood) किंवा छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांना जाहीरात क्षेत्रातून मोठी ओळख मिळाली आहे. एखाद्या जाहीरातीतील एखादं कॅरेक्टर हे कायमचं लक्षात रहातं. तुम्हाला ‘बंटी तेरा साबण स्लो है क्या’ या जाहीरातीतील (Advertisement) मुलगी माहित असलेच. काही वर्षांपूर्वीच्या या जाहीरातीतील मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लाईफ बॉय (LifeBoy) साबणाच्या अनेक जाहीरात झाल्या. पण त्या जाहीरातीतील ती गोंडस मुलगी आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे.
ती मुलगी आता दिसते ग्लॅमरस
लाईफ बॉयच्या जाहीरातीत दिसणाऱ्या त्या मुलीचं नावं आहे अवनीत कौर (Avneet Kaur). अवनीत कौर आता सोशल नेटवर्किंगवर (Social Network) लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली असून इन्स्टाग्रामवर 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.
आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते याला लाखोने लाईक्स आणि कमेंट मिळतात. वयाच्या 19 व्या वर्षी अवनीतला ‘मोस्ट स्टायलिस्ट इन्फ्यूएन्सर’ हा पुरस्कारही मिळालाय.
अवनीत कौरची लोकप्रियतासब टीव्हीवरील अलादीन या मालिकेत अवनीत कौरने प्रिन्सेस यास्मिनीच भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तीने अनेक सिनेमा आणि मालिकांकधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
डान्स इंडिया डान्स, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा, या सारख्या कार्याक्रमांमध्येही ती सहभागी झाली होती. ‘मेरी माँ’, ‘सावित्री’, ‘एक मुठ्ठी आसमान’, ‘हमारी सिस्टर दीदी’, ‘ट्विस्टवाला लव्ह’ सारख्या मालिकांमध्ये अवनीतने काम केलं आहे.
अनवीतची कमाई
अवनीतने आपल्या करीअरबरोबच आपलं शिक्षणही सुरु ठेवलं आहे. मुंबईच्या एका खाजगी कॉलेजमधून अवनीत कॉमर्सची पदवी घेतेय. अवनीत टिक-टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती. मीडिया रिपोर्टनुसार अवनीतचं नेटवर्क जवळपास 7 कोटी रुपये इतकं आहे. सोशल मीडिया आणि ब्रँड अॅम्बेसडन, प्रमोशनल पोस्ट या माध्यमातून ती दरमहिन्याला जवळपास 8 ते 10 लाख रुपये कमवते. याशिवाय म्यूझिक व्हिडिओ, टीव्ही मालिका आणि सिनेमातून अंदाजे 1 करोडपर्यंतची ती कमाई करते. अवनीत कौरकडे 80 लाख रुपयांची रेंजरोवर आहे. याशिवाय ह्युंडई, क्रेटा, स्कोडा, फॉर्च्यूनर अशा लक्झरी गाड्याही आहेत.