रणवीर सिंगला ४ कोटींची गाडी चालवणं पडलं महागात; मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Uncategorized

अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील एक दिलखुलास अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या मनमोकळ्या स्वभावाने, त्याच्या हटके स्टाईलने तो प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतो. अनेक बड्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत दिसणाऱ्या रणवीरच्या आवडीनिवडीही जबरदस्त आहेत. त्याला गाड्यांचे वेड आहे हे सर्वांनाच माहित आहे.

   

त्याच्याकडे काही जागप्रसिद्ध कंपन्यांच्या गाड्याही आहेत. या ताफ्यात लॅम्बॉर्गिनी, मर्सिडीज, ऍस्टन मार्टिन अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे. नुकतीच त्याने त्याची ऍस्टन मार्टिन ही आलिशान गाडी मुंबईच्या रस्त्यांवरून चालवली. पण ही गाडी चालवणे आता त्याला महागात पडणार असे दिसते.

काही दिवसांपूर्वीच रणवीरने त्याच्या ऍस्टन मार्टिन या गाडीची झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली. त्यावेळी काढण्यात आलेला रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यात तो त्याच्या या ४ कोटींची निळ्या रंगाची गाडी चालवताना दिसत होता.

हे वाचा:   विवाहित बॉयफ्रेंडला आजही भेटते रश्मिका मंदान्ना; रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

या व्हिडीओत या गाडीचा नंबरही स्पष्ट दिसला. त्या नंबरवरून एका नेटकऱ्याने या गाडीची संपूर्ण माहिती काढली. या मिळालेल्या माहितीत या गाडीचा इन्शुरन्स २ वर्षांपूर्वीच एक्सपायर झाला असल्याचे त्याला समजले.

https://twitter.com/annabhai2019/status/1581324582593888256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1581324582593888256%7Ctwgr%5E0f5938a813f24c373565f616ef5d59f74cef6b6f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbollywood%2Fnetizen-has-registered-complaint-against-ranveer-singh-rnv-99-3199314%2F

त्या माहितीच्या आधारे त्याने लगेच ट्विटरवरून मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. त्याने एक फोटो पोस्ट करत ट्वीटमध्ये त्याने लिहिले, “तुम्ही रणवीर सिंग विरुद्ध कडक कारवाई करा. त्याने जी गाडी चालवली त्याच्या इन्शुरन्स एक्सपायर झाला आहे.” हे लिहिताना त्याने मुंबई पोलिसांबरोबरच रणवीर सिंगलाही टॅग केले. त्यावर मुंबई पोलिसांनीही त्याला रिप्लाय दिला आहे. त्यांनी लिहिले, “आम्ही याची माहिती ट्रॅफिक ब्रॅंचला कळवली आहे.”

दरम्यान, रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टबरोबर झळकणार आहे. त्याबरोबरच या वर्षाखेरीस त्याचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply