Bollywood Actress Quit Acting: लग्नानंतर ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी सोडलं बॉलिवूड, जाणून घ्या

Uncategorized

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्न झाल्यानंतरही पडद्यावर झळकतायत.जस आलिया भट्ट (Alia bhatt), दिपीका पदूकोन (Deepika Padukon) आणि प्रियंका चोपडा (Priyanka Chopda) यासह इतर अनेक अभिनेत्रींच नाव या पक्तीत येत. त्यात एक काळ असा होता, ज्यावेळेस अभिनेत्री लग्न झाल्यानंतर बॉलिवूड (Bollywood) सोडून द्यायच्या, त्या लाईमलाईटमध्ये सुद्धा नसायच्या. लग्न झाल्यानंतर त्यांनी चुल आणि मुलाची जबाबदारी संभाळली. या अभिनेत्री कोण होत्या, ते जाणून घेऊय़ात.

   

सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) 1994 मध्ये अभिनय विश्वात दाखल झाली. पण 2002 मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर सोनालीचे लक्ष घराकडेच जास्त लागले, त्यामुळे 2003 नंतर तिने हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला. 2004 मध्ये तिचा मराठी आणि तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर ती 9 वर्षे पडद्यापासून दूर राहिली. 2013 मध्ये तिने कॅमिओ केला होता. त्यानंतर ती आता छोट्या पडद्यावर आणि 2021 पासून ओटीटीवर सक्रिय आहे.

हे वाचा:   विराट कोहली-अनुष्का शर्मा बॉडीगार्डवर खर्च करतात कोट्यवधी रुपये,पगार जाणून तुम्हीही लावाल डोक्याला हात

जेनेलिया डिसूजा

2012 मध्ये रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर जेनेलियाचे (Genelia D’Souza) आयुष्य पुर्णत बदलले. तिने अभिनयावर लक्ष न देता आपल्या कौटूबिक जबाबदारीवर जास्त लक्ष दिले. ती कॅमेऱ्यांवर दिसली तरी ती छोट्या आणि साईड रोलमध्ये. ती प्रत्येक चित्रपटात कॅमिओ करत राहिली पण आता लग्नाच्या 10 वर्षानंतर ती मुख्य भूमिकेत पडद्यावर परतणार आहे. तिचा मराठी चित्रपट वेद आणि हिंदी चित्रपट मिस्टर ममी प्रदर्शित होणार आहेत.

असिन

साऊथमध्ये चमक दाखवल्यानंतर, असिन बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत दिसली, तिने लग्न होताच अभिनयाला अलविदा केला आणि आजपर्यंत ती कॅमेऱ्यापासून दूर आहे. असिन (Asin) गजनी, रेडी यांसारख्या चित्रपटात दिसली होती पण 2016 मध्ये राहुल शर्मासोबत लग्न झाल्यापासून ती घरात जबाबदारीत अडकली आहे.

नम्रता शिरोडकर

बॉलीवूडमध्ये भरपूर काम केल्यानंतर नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) जेव्हा साऊथकडे वळली तेव्हा तिथल्या महेश बाबूसाठी (Mahesh Babu) तिचं प्रेम जुळलं. मग काय होतं, दोघांचं लग्न झालं आणि नम्रता संसारात व्यस्त झाली. लग्न झाल्यापासून नम्रता कॅमेऱ्यापासून दूर आहे.

ट्विंकल खन्ना

हे वाचा:   म्हणून मी टीव्ही इण्डस्ट्री सोडली... मराठी अभिनेत्रीने सांगितलं पडद्यामागचं धक्कादायक सत्य

ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) स्वत:ला बॉलिवूडमध्ये (Bollywood) बरीच वर्षे दिली, पण जेव्हा ती पडद्यावर फारस काही कमाल दाखवू शकली नाही तेव्हा तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तिचा मेला चित्रपट प्रदर्शित झाला आणि ती अक्षय कुमारला डेट करत होती, म्हणून तिने अक्षयला वचन दिले की जर तिची गोरी चालली नाही तर ती त्याच्याशी लग्न करेल आणि अभिनय सोडेल. नेमकं तेच झालं. तेव्हापासून ट्विंकल चित्रपटांमध्ये दिसली नाही.

या अशा काही बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आहेत, ज्या लग्न झाल्यानंतर क्वचितच पडद्यावर दिसल्या तसेच लाईमलाईट पासूनही दुर झाल्या होत्या.

Leave a Reply