‘आम्ही बंद खोलीत रात्रभर…’ दीपिका पदुकोणचा EX बॉयफ्रेंड रणबीर कपूरबाबत मोठा खुलासा

Uncategorized

एकेकाळी एकमेकांना डेट करणाऱ्या दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपला बराच काळ लोटला आहे. दीपिकाने आता या ब्रेकअप मागचं कारण सांगितलं आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने रणबीरचे नाव न घेता नातं तुटण्यामागची व्यथा व्यक्त केली.या मुलाखतीमध्ये दीपिका म्हणाली की, ‘मी त्याला रंगेहात पकडलं होतं. आणि हीच ती वेळ होती जेव्हा सगळ्या भावना विसरून मी त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

   

‘जेव्हा मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला अनेकांनी सांगितलं होतं की, तो तुला फसवत आहे. मला स्वतःलाही हे माहित होतं मात्र जेव्हा त्याने मला ब्रेकअप न करण्याची वारंवार विनंतीही केली तेव्हा मी त्याला दुसरी संधीही दिली. “मी कोणाची फसवणूक केली नाही”

हे वाचा:   इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

दीपिका पुढे म्हणाली, ‘रिलेशनशिपमध्ये असताना मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही. असं जर मला करायचं असतं तर अविवाहित राहणं योग्य आहे. ती पुढे म्हणाली, ‘जेव्हा त्याने मला पहिल्यांदा फसवलं तेव्हा मला वाटलं की, आमच्या नात्यात काही कमतरता आहे, म्हणूनच हे घडलं असावं. पण जेव्हा फसवणूक ही एखाद्याची सवय होऊन जाते, तेव्हा नात्यात सर्वस्व देऊनही आपण हरतो. मी नात्यात सर्व काही दिलं पण ते परत मिळेल अशी अपेक्षा कधीच केली नाही.

दीपिका पुढे म्हणाली- विश्वास तोडल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या भावना पूर्णपणे गमावून बसता. ब्रेकअपनंतर मी अनेक दिवस रडले. काळ पुढे गेला आणि मी एक चांगली माणूस झाले, मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले.

हे वाचा:   'मला भीती वाटत होती की कोणी...' बहिणीवर अॅसिड हल्ल्यानंतर अशी झाली होती कंगनाची अवस्था

इतकेच नाही तर दीपिकाने सांगितलं की, रणबीरच्या फसवणुकीबाबत आम्ही रोज रात्री बंद खोलीत भांडायचो. तो माझ्यावर रागावायचा आणि रात्रभर माझ्याशी भांडायचा, असंही अभिनेत्रीने सांगतिलं. आमची भांडणं सकाळपर्यंत चालायची. रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिला फक्त वेदनाच झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

Leave a Reply