सध्या सर्वत्र साऊथ सिनेमांचा बोलबाला सुरू आहे. अशातच एका साऊथ इंडियन अभिनेत्याची लव्ह लाइफ चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्यानं स्वत: त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेता बबलू पृश्वीराज हा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. दुसरं लग्न करणारा हा काही पहिलाच अभिनेता नाहीये पण अभिनेता ज्या मुलीशी लग्न करतोय आणि ज्या वयात करतोय यावरून चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता बबलू पृश्वीराज याची होणारी बायको ही त्याच्या मुलाच्या वयापेक्षा लहान आहे. अभिनेता त्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला. पहिल्या लग्नातून अभिनेत्याला मुलगा आहे. आपल्या मुलीपेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर लग्न करण्यावरून अभिनेत्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. पण ट्रोलिंगवरही अभिनेत्यानं चोख उत्तरं दिली आहेत.
अभिनेता बबलू पृश्वीराजचं वय हे 57 वर्ष आहे. त्याची होणारी पत्नी त्यापेक्षा 33 वर्षांनी लहान आहे. शितल असं तिचं नाव असून पहिल्या पत्नीपासून विभक्त झालेल्या या अभिनेत्याला 27 वर्षांचा मुलगा आहे. ज्याच नाव आहे अहद. अभिनेत्याची होणारी पत्नी ही केवळ अभिनेत्याच्या नाही तर त्याचा मुलगा अहद यांच्याही पेक्षा लहान आहे. अहद आणि शीतल यांच्यात केवळ 2 वर्षांचं अंतर आहे.
बबलू आणि शीतल यांच्या लग्नाच्या घोषणेनंतर जबरदस्त ट्रोलिंग करण्यात आलं. त्यानंतर एका मुलाखतीत शीतला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याची तिनं फार समजूतदारीनं उत्तर दिली आहेत. अहद 27 वर्षांचा आहे आणि तू 24 वर्षांची. तू अहदची निट काळजी घेऊ शकतेस असं तुला वाटतं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, ‘अहद माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. पण आताही तो बच्चाच आहे. तुम्ही जर अहदला भेटलात तर तुम्हाला खूप पॉझिटिव्हीटी मिळेल. मी अहद कडून खूप काही गोष्टी शिकली आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे दुसऱ्याची काळजी करणं आणि स्वत:चं ऐकणं. मी त्याच्याबरोबर खूप वेळ घालवला आहे. त्याच्याबरोबर मी खूप खुश असते’.
कोण आहे शितल?
शितल ही मलेशियाची आहे असं म्हटलं गेलं होतं पण ती आंध्र प्रदेशची असल्याचं तिनं सांगितलं. शीतल एक जीम ट्रेनर आहे. शीतल आणि बबलू यांची ओळख जीममध्येच झाली होती. दोघेही इन्स्टाग्रामवर वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असतात. दोघांची केमिस्ट्री अनेकांना आवडते. बबलू ही फिटनेस फ्रिक आहे. फिटनेस हे दोघांना एकत्र आणण्यातला मोठा दुवा बनला आहे.
सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगवर अभिनेता बबलूनं उत्तर देत म्हटलं होतं की, जर शितलच्या कुटुंबाला तिनं माझ्याशी लग्न करण्यात काहीच प्रोब्लेम नाहीये कर लोकांना काय प्रोब्लेम आहे. लहान वयाच्या मुलीवर प्रेम करण्यात मला काही चूक वाटत नाही.