एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण ऐकून तुम्हालाही येईल उलटी

Uncategorized

अनेक लोक चहा आणि कॉफीचे शौकीन असतात. प्रवासात अनेक जण चहा-कॉफीला प्राधान्य देतात. विमानात प्रवास करताना तुम्ही कॉफी आणि चहा घेतला असेलच. मात्र, एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहित नसेल की, एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत. पण याचे तुम्ही कारण कधी जाणून घेतले नसेल तर आम्ही ते सांगत आहोत. एअर होस्टेस ( air hostess) कधीच विमानात चहा -कॉफी पीत नाही, हे सत्य जाणून तुम्ही त्यावर पाणीही सोडाल… (Why Air hostess never drink coffee in flight)

   

हे तुम्हाला माहित नसेल…

विमानात काम करणारी एअर होस्टेस आणि केबिन क्रू विमानाच्या आत कधीही चहा-कॉफी पीत नाहीत. याचे कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही पुढच्या वेळी प्रवासात कॉफी पिण्यापूर्वी चार वेळा विचार कराल. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस सिएरा मिस्ट हिने फ्लाइट अटेंडंट आणि पायलटचे रहस्य सांगितले आहे. एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये, सिएरा सांगते की, फ्लाइट क्रू फ्लाइटमध्ये पाण्याची बाटली वापरणे टाळतात. तसेच ‘मी तुम्हाला फ्लाइट अटेंडंटशी संबंधित काही रहस्य सांगेन. जे मी सांगितले ते, तुम्हाला माहित नसेल.

हे वाचा:   ‘आमच्या नात्याला लेबल नाही…’, ‘त्या’ अभिनेत्याच्या आठवणीत तब्बू आजही एकटीच

एअर होस्टेसचा धक्कादायक खुलासा

एअर होस्टेस सिएरा मिस्ट याबाबत या व्हिडिओत खुलासा केला आहे की, जे पाणी आम्ही चहा-कॉफी बनवण्यासाठी वापरतो ते प्लेनच्या त्या टॅंकमधून येतं तो टँक कधीही साफ केले जात नाही. सिएराने पुढे सांगितलं की, एअरलाइन्स कंपन्या वेळोवेळी पाण्याची टेस्ट नक्की करतात. पण जर पाण्यात काही सापडलं नाही तर टॅंकची सफाई करत नाही. आता सांगा तुम्ही अशावेळी चहा किंवा कॉफी घेण्याचा विचार तरी कराल का?

पायलट विमानात चहा-कॉफी पित घेत नाहीत!

एअर होस्टेस सिएरा मिस्टचे टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत. ती तिच्या कामाची माहिती अधूनमधून पोस्ट करत असते. पण आता तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायर होत आहे. जवळपास 78 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये तिने फ्लाइट अटेंडंट आणि पायलटचे रहस्य सांगितले आहे.

Leave a Reply