अखेर रानू मंडलला भेटला बॉयफ्रेंड?, बाईकवर मुलासोबत दिसली रोमांस करताना, व्हिडीओ व्हायरल

Uncategorized

सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण प्रकाशझोतात आले. ज्यांना एका रात्रीत खूप लोकप्रियता मिळाली. याचे मोठे उदाहरण म्हणजे रानू मंडल (Ranu Mandal). रानू मंडलच्या सुरेल आवाजाने देशभरातील अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. रानू मंडल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

   

Ranu Mondal : रातोरात स्टार झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत रानू मंडलची (Ranu Mondal)गणना केली जाते. सध्या सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रानू मंडल बाईकवर बसलेली असून व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोमॅंटिक गाणे टाकण्यात आले आहे. या व्हिडीओवरून तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्स करत तिचा शुभेच्छा देत आहेत.

हे वाचा:   ‘रामायण’मालिकेत रावण साकारणाऱ्या अभिनेत्याने हेमा मालिनींच्या लगावली होती कानशिलात, वाचा नेमकं काय घडलं होतं

व्हिडीओमध्ये रानू मंडलसोबत बाईकवर बसलेला मुलगा गाण्यावर लिप्सिंग करत आहे. हा मुलगा रानू मंडलपेक्षा वयाने छोटा आहे. त्यामुळे आता हा मुलगा नक्की कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही नेटकरी रानू मंडलला शुभेच्छा देत आहेत तर काही खिल्ली उडवत आहेत. अखेर रानू मंडलला बॉयफ्रेंड मिळाला, असं म्हणत नेटकरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

रानू मंडल कोण आहे? 

2019 मध्ये गाणकोकिळा लता मंगेशकर यांचे ‘प्यार का मगमा’ गाणे गात रानू मंडल रातोरात स्टार झाली. रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडलचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर तिने थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये तीन गाणी रेकॉर्ड केली.

हे वाचा:   देवेंद्रजींना फराळात ‘हा’ पदार्थ खायला आवडतो, अमृता फडणवीसांनी सांगितले गुपित

रातोरात बदलले होते नशीब!

काळ बदलायला खरोखरच वेळ लागत नाही. कधीकाळी रानू रेल्वे स्टेशनवर बसून गाणी म्हणायची. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर गायक हिमेश रेशमियानेही आपल्या चित्रपटात तिला गाण्याची संधी दिली. त्यादरम्यान रानू देखील खूप चर्चेत होती. पण, काळ बदलला आणि रानू अवस्था पूर्वीसारखीच झाली. आता रानू मंडलवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री इशिका डे रानूची भूमिका साकारणार आहे.

Leave a Reply