“आमचं मिशन पूर्ण झालं”; भगव्या बिकिनीवरील वादादरम्यान ‘पठाण’चे दिग्दर्शक असं का म्हणाले?

Uncategorized

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यावरून मोठा वादसुद्धा निर्माण झाला. ‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. भाजपसोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप केला जातोय. या वादावर आतापर्यंत बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. या गाण्यात दीपिकाला बिकिनीमध्ये का दाखवलं, याचं उत्तर आता दिग्दर्शकांनी दिलं आहे.

   

काय होतं कारण?

पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले, “दीपिका ही फक्त इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्री नाही, तर प्रत्येक चित्रपटानुसार ती पुढे पाऊल ठेवताना दिसते. पडद्यावर अत्यंत सहज अभिनय करताना ही ग्लॅमरससुद्धा दिसते. त्यामुळे जर दीपिका तुमच्या चित्रपटात असेल तर तिच्या इमेजसोबत न्याय करण्याची जबाबदारी तुमची आहे.”

हे वाचा:   दोन बायका फजिती ऐका! प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही पत्नी सोबतच प्रेग्रेंट; फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

बिकिनी लूकच का निवडला या प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले, “दीपिकाला तिच्या आतापर्यंतच्या सर्वांत ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात मला या गाण्यात दाखवायचं होतं. ही गोष्ट मी माझ्या टीमला सांगितली आणि दीपिकाला अशा अंदाजात दाखवणं हा आमचं मिशन बनलं. हे मिशन पूर्णसुद्धा झाला.”

“बेशर्म रंग हे गाणं स्पेनच्या समुद्रकिनारी शूट केलं जाईल असं शूटिंगदरम्यान ठरलं होतं. स्क्रीनवर दीपिकाला जितक्या हॉट अंदाजात दाखवलं जाईल, तितक्या हॉट अंदाजात दाखवावं, असा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आम्ही काम केलं. आमच्या या निर्णयावर दीपिकासुद्धा खूश होती. तिने आम्हाला तिच्या कॉकेट, हॅप्पी न्यू इअर आणि गहराईयाँ या चित्रपटांमधील लूक पाहण्याचा सल्ला दिला”, असंही दिग्दर्शकांनी सांगितलं.

Leave a Reply