गोळ्या खाऊन गर्भपात…’; तुनिषाच्या मैत्रिणीच्या दाव्यानं पुन्हा खळबळ, शिझानवर गंभीर आरोप

Uncategorized

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर हैराण करणारे खुलासे होतायेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायेत. अभिनेत्रीच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा अधिक तपास यावा यासाठी शिझान खानला ४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

   

चौकशीदरम्यान शिजानने तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिझान खानने सांगितले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांने सांगितले. मात्र तुनिषाच्या मैत्रिणीने शिझानवर धक्कादायक आरोप केले आहेत.

तुनिषाची मैत्रीण रय्या लबीब हिने तुनिषा आणि शिझानच्या नात्याबाबत अनेक दावे केले आहेत. शिझानवर गंभीर आरोप करत रय्या म्हणाले, ‘तिला (तुनिषा) नैराश्याने ग्रासले होते आणि तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तिला याबद्दल बोलायचे नव्हते.

शिझानने अनेक मुलींना प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर केला. तो त्या सर्व मुलींची फसवणूक करत होता. त्याचे पडद्यावरचे रूप पाहून मुली प्रभावित व्हायच्या आणि त्याच्याशी मैत्री करायला तयार व्हायच्या, असा दावा रय्या लबीब हिने केला आहे.

हे वाचा:   'तुझ्या मुलानं मजा करायच्या वयात तूच...' अर्जुनला किस करतानाच्या फोटोमुळे मलायका ट्रोल

रय्या लबीब पुढे म्हणाली की, ‘शिझानने तिच्यासोबत फक्त सेक्ससाठी रिलेशनशिप ठेवली होती. त्याला लग्न किंवा प्रेमात रस नव्हता. तुनिषा शिझानपासून गरोदर राहिली असण्याची शक्यता आहे. मृत्यूवेळी ती गरोदर नव्हती, पण याआधी गरोदर राहिली असण्याची शक्यता असून आणि गोळ्या खाऊन गर्भपात केला असावा. मला निश्चितपणे माहित नाही, पण ती एका गोष्टीबद्दल खूप तणावात होती, असं रय्या लबीब हिने सांगितले. रय्या लबीबच्या दाव्यांमुळे शिझानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शिझानच्या बहिणीने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची दूसरी बाजू जाणून घेणेही आवश्यक आहे. मात्र आमच्यावर आलेल्या या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी थोडं एकांतात राहू द्या. दोन्ही कुटुंबे पीडित आहेत. योग्य वेळ येऊ द्या आणि आपण या विषयावर नक्कीच बोलू. पण ही योग्य वेळ नाही. मृत्यू ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. पीडितेच्या कुटुंबाचा विचार करताना प्रत्येकाने त्यांना एकांतात राहण्याची संधी द्या, असं शिझानची बहिणीने सांगितलं.

हे वाचा:   “मी कुठे व्हर्जिन…” दोन वेळा घटस्फोट झालेल्या पुरुषाबरोबर लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट

शिझानच्या बहिण पुढे म्हणाली की, ‘हे खूप दुर्दैवी क्षण आहेत. आम्ही एक मौल्यवान व्यक्ती गमावली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शिझानवर अनेक आरोप ठेवण्यात आले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. कोणताही विचार न करता निष्पाप मुलाला फसवले जात आहे, असे माझे मत आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. मात्र सत्य स्वतःच बाहेर येईल, असं शिझानची बहिणीने सांगितले.

Leave a Reply