परदेशात शूटिंग करताना नाकातून झाला रक्तस्त्राव अन्… सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

Uncategorized

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ मधून प्रसिद्धीझोतात आलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. हिमांशीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाचे शूटिंग करत होती.

   

मात्र, तिने रोमानियामध्ये उणे ७ डिग्री सेल्सिअस तापमानात शूटिंग केलं आणि ती आजारी पडली. हिमांशीला खूप ताप आला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हिमांशी सध्या रोमानियामध्ये ‘फत्तों दे यार बडे ने’ या पंजाबी चित्रपटाचं शूटिंगसाठी गेली आहे. या चित्रपटात हिमांशीसह इंदर चहल, निशा बानू यांच्याही भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार हिमांशीला ताप होता, पण तरीही ती शूटिंग करत होती.

चित्रपटातील एका दृश्यासाठी तिला थंड पाण्यात शूट करायचं होतं. पण, तिची प्रकृती बिघडल्याने नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचा:   सारा अली खानचा सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, मद्यधुंद अवस्थेत धड चालताही येत नव्हतं

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत कोणतेही अपडेट नसले तरी. हिमांशीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती थंडीपासून बचावासाठी भरपूर कपडे परिधान करून दिसत होती. तसेच ‘थंडी खूप आहे पण शूट करावे लागेल,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.

हिमांशीने काही दिवसांपूर्वी मानसिक आरोग्याविषयी भाष्य केले होते. तिने बिग बॉसच्या घरातील नकारात्मक वातावरणामुळे हिमांशी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. शो सोडल्यानंतरही ती जवळपास दोन वर्षे डिप्रेशनमध्ये होती. तिला कधीकधी पॅनीक अटॅक येऊ लागले होते. यातून बाहेर पडण्यासाठी तिला उपचार घ्यावे लागले होते.

Leave a Reply