“मी कंडक्टर होतो, तेव्हा त्यानेच…” उपकाराची जाण असलेले रजनीकांत, भर पुरस्कार सोहळ्यात सांगितलेली ‘त्या’ मित्राची गोष्ट

Uncategorized

दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारे सुपरस्टार म्हणून रजनीकांत यांना ओळखले जाते. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस. रजनीकांत यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचा पडद्यावरील अभिनय, डायलॉग बोलण्याची शैली, चालण्याची स्टाईलचे लाखो चाहते आहेत.

   

रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतात. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना वर्षभरापूर्वी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी अनेकांचे आभार मानले होते.

रजनीकांत यांनी १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबूर्वा रांगणगल’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला चित्रपट. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. मात्र अभिनयाची आवड असणाऱ्या रजनीकांत यांना एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे वाचा:    कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- 'मी कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही...'

रजनीकांत यांना वर्षभरापूर्वी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणादरम्यान अनेकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी हा पुरस्कार गुरु के. बालाचंद्र यांना अर्पण केला. यावेळी ते म्हणाले, “सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाते.

चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा मला फार आनंद आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. मी हा पुरस्कार माझे गुरु के. बालाचंद्र यांना समर्पित करतो.

मला या क्षणी काही लोकांचे आभार व्यक्त करायचे आहेत ज्यांनी मला या संपूर्ण प्रवासात कायम साथ दिली. माझे भाऊ सत्यनारायण गायकवाड हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला उत्तम संस्कार आणि अध्यात्म्याची शिकवण देऊन माझी वाढ केली.

हे वाचा:   ‘अक्षय कुमार’सोबत काम करण्यासाठी पूर्ण कपडे काढायला तयार झाली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आणि शेवटी खरंच काढले होते..

याबरोबरच कर्नाटकातील माझा मित्र आणि सहकारी राजबहादूर जो बस ड्रायव्हर आहे. पण मी त्याचेही आभार मानू इच्छितो. कारण मी जेव्हा बसमध्ये कंडक्टर होतो, त्यावेळी त्यानेच माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखले. त्यानेच मला चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सर्वांना मी माझा हा पुरस्कार समर्पित करतो.

इतकंच नव्हे तर सर्व निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निशियन्स, वितरक, प्रदर्शक, मीडिया आणि माझे चाहते, तामिळ भाषिक लोक या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांच्याशिवाय मी काहीही नाही,” असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.

Leave a Reply